भारतातील पहिल्या महिला पोलिस महासंचालक (DGP), किरण बेदींच्या नंतर सर्वाधिक चर्चा त्यांचीच

पोलीसनामा ऑनलाईन टीम – देशाच्या पहिल्या महिला IPS अधिकारी किरण बेदी यांच्यानंतर ज्या कोणत्या महिला अधिकाऱ्यांची सर्वत्र चर्चा होती त्या म्हणजे IPS कांचन चौधरी यांची. त्या देशातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक (DGP) देखील होत्या. १९७३ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी कांचन चौधरी यांचे सोमवारी (ता. २६) निधन झाले. त्यांच्या जीवनावर आधारित ‘उडान’ नावाची मालिकाही दुरदर्शन वाहिनीवर प्रदर्शित करण्यात आली होती.
Kanchan-Chowdhary-2
कांचन यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. मात्र २००४ मध्ये त्यांना पहिल्यांदाच पोलीस महासंचालक पदी नियुक्त करण्यात आले. अशाप्रकारे देशाच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक होण्याचा मान त्यांनी मिळविला. त्यानंतर ३१ ऑक्टोबर २००७ मध्ये त्या पोलीस महासंचालक पदावरुन निवृत्त झाल्या. निवृत्तीनंतर त्यांनी आम आदमी पक्षातून निवडणूक लढवून राजकारणात सक्रीय सहभाग घेतला. हिमाचल प्रदेशातील मुळच्या रहिवासी असलेल्या कांचन चौधरी यांनी अमृतसरच्या शासकीय महिला महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांच्या जीवनावर आधारित ‘उडान’ मालिकेला प्रेक्षकांनी प्रचंड पंसती दिली होती.
kanchan-Chowdhary-3
मालिकेत दाखविण्यात आले होते की, मालमत्तेच्या एका प्रकरणात तिच्या वडिलांना पोलिस अटक करतात. त्यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार दाखल केली जात नाही. मात्र वडिलांवर झालेला अन्याय तिच्या जिव्हारी लागलेला असतो. त्यामुळे कोणत्याही निर्दोष व्यक्तीवर अन्याय होऊ नये, या उद्देशाने ती आयपीएस अधिकारी होण्याचे ठरविते. या मालिकेची विषेश बाब म्हणजे यात कांचन चौधरी यांची भुमिका त्यांच्या सख्ख्या लहान बहिणीने निभावली होती.
kanchan-Chowdhary-5
राजकारणात सक्रीय असताना त्या दररोज तीन तास गरीब लोकांना भेटायच्या. तसेच दिवसातून किमान पन्नास लोकांशी गाठीभेटी घ्यायच्या, त्याच्या समस्या अडचणी ऐकायच्या. मालिकेतही त्यांच्या साहसी कामांना दाखविण्यात आले होते. ज्यामुळे त्या काळातील पिढीच्या त्या आदर्श बनल्या होत्या.
Kanchan-Chowdhary-7
मेक्सिकोमध्य़े २००४ ला झालेल्या इंटरपोलच्या बैठकीसाठी कांचन चौधरी यांची भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली होती. त्याआधी १९९७ मध्ये विशिष्ठ सेवांसाठी त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय त्यांना राष्ट्रीय पुरस्कार, दूरदर्शन पुरस्कार, उत्तराखंड गौरव पुरस्कार, स्त्री शक्ती पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
Kanchan-Chowdhary-9
‘जोधपूर पोलिस विद्यापीठा’च्या स्थापनेतही त्यांचा सक्रीय सहभाग होता. त्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्याही होत्या. याशिवाय महिलांनी त्यांच्याद्वारे तयार केलेल्या समुपदेशन केंद्रांचे कौतुक केले गेले, ज्यात समाजातील प्रबुद्ध लोकही होते.
Kanchan-chowdhary-8

आरोग्यविषयक वृत्त –