अभिनेत्री कंगनाच्या ‘पंगा’चा फर्स्ट लुक रिलीज, ‘असा’ आहे रोल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार कंगना रणौत लवकरच जयललिता यांच्या थलायवी बायोपिकमध्ये झळकणार आहे. याशिवाय ती पंगा या सिनेमातही काम करताना दिसणार आहे. नुकताच पंगा सिनेमाचा फर्स्ट लुकही समोर आला आहे.

कंगनाची बहिण रंगोली चंदेलनं पंगा सिनेमाचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. कंगनाचा फोटो ट्विट करत रंगोली म्हणते, “जेव्हा ती नवीन होती तेव्हा आईच्या रोलसाठी अप्रोच करणं एक इनसल्ट होता. यामुळे तिला वाईट वाटत होतं. परंतु मणिकर्णिका सिनेमात तिनं आईची भूमिका साकारल्यानं पुन्हा ती आईच्या रोलसाठी सेट आहे. आज मेनस्ट्रीमच्या यंग टॉप अभिनेत्री ज्या करिअरच्या टॉपवर आहेत त्या आईची भूमिका गर्वानं साकारतात आणि लोकांनाही ते आवडतं. हा आहे नवीन इंडिया.”

https://twitter.com/Rangoli_A/status/1207481178619428865

रंगोलीच पोस्ट पाहून पंगा सिनेमातील कंगनाच्या रोलचा अंदाज लावला जाऊ शकतो. काही दिवसांपूर्वीच डायरेक्टर अश्विनी अय्यर तिवारीनं घोषणा केली होती की, पंगा सिनेमा 24 जानेवारी 2020 रोजी रिलीज होणार आहे. पंगा सिनेमाचा स्ट्रीट डान्सर 3 डी सिनेमासोबत क्लॅश होणार आहे. दरम्यान पंगा सिनेमात कंगनाव्यतिरीक्त नीना गुप्ता, जस्सी गिल, पंकज त्रिपाठी हेही कलाकार आहेत.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर पंगा सिनेमानंतर तिचा थालयवी हा सिनेमा लगेच रिलीज होणार आहे. यात कंगना तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा 26 जानेवारी 2020 रोजी रिलीज होणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/