‘महाराष्ट्रातील ‘पप्पू’सेनेला माझ्याशिवाय करमतचं नाही’, कंगनाचा ठाकरे सरकारवर पुन्हा निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री कंगना विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील शिवसेना सरकारने तिच्या विरोधात नवीन एफआयआर दाखल केला असल्याचा दावा बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने शनिवारी केला. महाराष्ट्रातील पप्पू सेनेला माझ्याशिवाय करमतचं नाही, असा टोला तिने यावेळी राज्य सरकारला लगावला आहे. कंगनाने ट्विटरवरून नवरात्रीचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यावेळी तिने राज्य सरकारचा उल्लेख पप्पू सेना करत पुन्हा एकदा राज्यातील सरकारवर निशाणा साधला आहे.

कंगनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, नवरात्रीमध्ये कोणी कोणी उपवास ठेवला आहे ? आज नवरात्रीनिमित्त हे काही फोटो काढले आहे. कारण मी स्वत: उपवास ठेवला आहे. माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील पप्पू सेनेला माझ्याशिवाय करमतच नाही. माझी इतकी पण आठवण काढू नका, मी लवकरच येणार आहे, असे म्हणत तिने महाराष्ट्रातील सरकारला डिवचले आहे.

कांगना राणौत विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआर दाखल करण्याचे आदेश वांद्रे कोर्टाने मुंबई पोलिसांना दिले होते. धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप कंपनावर लावण्यात आला असून त्यामुळेच तिच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. कलम 124 अ, 153 अ, 295 अ, 34 या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंगनाची बहीण रंगोली विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.