‘कोरोना’ व्हायरसला नष्ट करेल ‘हा’ चहा, HIV औषधांपेक्षा जास्त ‘परिणाम’कारक

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरसला तोंड देण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) ऐवजी एचआयव्ही प्रतिबंधक औषधाच्या वापराची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुरूस्त प्रोटोकॉलमध्ये इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) प्रतिकार शक्ती (इम्युनिटी पॉवर) मध्ये सुधारणा आणि उपचारासाठी एचआव्ही प्रतिबंधक औषधाचा उपयोग करण्याबात सांगितले जाऊ शकते, असे म्हटले आहे.

तर, कांगडा चहामधील रसायन सुद्धा प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी लाभदायक ठरू शकतात. हा कांगड़ा चहा अँटी-एचआयव्ही औषधांच्या तुलनेत कोरोनाचा व्हायरसला चांगल्याप्रकारे तोंड देऊ शकतो. हिमाचल प्रदेशच्या पालमपुर येथील हिमालय जैवसंपदा प्रौद्योगिकी संस्थेचे (आयएचबीटी) संचालक डॉ. संजय कुमार यांनी कांगड़ा चहाच्या गुणांबाबत सांगितले. अतंरराष्ट्रीय चहा दिवसाच्या निमित्ताने वेबिनारमध्ये याबाबत ते बोलत होते.

डॉ. संजय कुमार यांनी आपल्या व्याख्यानात कांगड़ा चहा समाज आणि उद्योगासाठी कशा प्रकारे लाभदायक आहे हे सांगितले. सोबतच त्यांनी चहाच्या औषधी गुणांबाबत तसेच कोविड-19 ला तोंड देण्यासाठी आयएचबीटीद्वारे विकसित आणि हस्तांतरित प्रॉडक्टवर चर्चा केली.

त्यांनी सांगितले की, चहामध्ये अशी रसायने आहेत जी कारोना व्हायरसला प्रतिबंध करण्यात एचआयव्ही-प्रतिबंधक औषधांच्या तुलनेत अधिक प्रभावी ठरू शकतात. आमच्या शास्त्रज्ञांनी कम्प्यूटर-आधारित मॉडलचा वापर करत जैविक रूपाने सक्रिय 65 रसायने किंवा पॉलीफेनॉल्सचे परिक्षण केले, जे विशिष्ट व्हायरल प्रोटीनला एचआयव्ही-प्रतिबंधक औषधांच्या तुलनेत अधिक चांगले ठरू शकते. हे रसायन त्या व्हायरल प्रोटीन्सच्या हालचालींना विरोध करू शकतात, जे मानवी पेशीत व्हायरसला वाढण्यास मदत करतात.

त्यांनी सांगितले की, आयएचबीटी आपल्या भागीदारांसोबत मिळून चहावर अधारित नैसर्गिक सुगंधी तेलयुक्त अल्कोहोलयुक्त हँड सॅनिटायजरचे सुद्धा उत्पादन करत आहे. आयएचबीटीमध्ये चहाच्या अर्काच्या उपयोगाने हर्बल साबणसुद्धा बनवण्यात आला आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, हा साबण फंगल्सविरोधी, जीवाणु विरोधी व व्हायरस-विरोधी गुणयुक्त आहे. हिमाचलच्या दोन कंपन्यांकडून या साबणाचे उत्पादन केले जात आहे.