कपिल देव म्हणतात, विराट माझ्यापेक्षा ‘उत्‍तम’ कॅप्टन ; ‘पाक’ला 10 पैकी 7 वेळा मैदानात ‘लोळवू’ शकते टीम इंडिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना होणार आहे. मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात हा सामना रंगणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट असल्याने क्रीडा रसिक आणि भारतीय पाठीराखे चिंतेत आहेत. त्यामुळे सगळ्यांचे या सामन्याकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे जर हा सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होणार? हा प्रश्न साहजिकच सर्वांना पडला असणार. त्यामुळे उद्या हवामान खात्याने देखील मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दिवसभरात तीनवेळा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
त्याबरोबरच या सामन्याविषयी अनेक दिग्गज आपले मत व्यक्त करत आहेत.

भारतीय संघाला पहिला वर्ल्डकप जिंकून देणारे माजी खेळाडू आणि कर्णधार कपिल देव यांनी भारतीय कर्णधार विराट कोहली याची स्तुती करत तो माझ्यापेक्षा उत्तम कर्णधार असून भारतीय संघ हा आजपर्यंतचा सर्वोत्तम संघ आहे. जर भारत आणि पाकिस्तान यांच्यात १० सामने खेळवले गेले तर त्यातील ७ सामन्यांत भारत विजयी होईल. शुक्रवारी एका कार्यक्रम बोलताना त्यांनी हे भाष्य केले. सामन्याच्या दिवशी काय होईल हे देवालाच माहित, मात्र आमच्यावेळचा पाकिस्तानी संघ हा आताच्या पाकिस्तानी संघापेक्षा खूप मजबूत होता.

भारतीय गोलंदाजी मजबूत

यावेळी भारतीय गोलंदाजी विषयी बोलताना ते म्हणाले कि, आताची भारतीय गोलंदाजी सर्वात मजबूत आहे. जसप्रीत बुमरा सारखा खेळाडू जगातील एक नंबरचा गोलंदाज आहे, यावरूनच भारतीय गोलंदाजी मजबूत आहे. ज्यावेळी जसप्रीत बुमराने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते त्यावेळी तो इतका मोठा पल्ला गाठेल असे वाटले नव्हते असेदेखील ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी भारतीय प्रेक्षक आणि पाठीराखे मात्र पाऊस न पडण्याची प्रार्थना करत आहे. त्यामुळे आता उद्या मैदानावर काय घडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सिनेजगत

मलाइका-अर्जुन यांच्या नात्याबद्दल अरबाज खानने दिले मिडियाला ‘हे’ उत्तर

‘त्या’ कपडयांवर मलायका अरोरा पुन्हा एकदा हॉस्पीटल ‘समोर’च दिसली, चाहत्यांमध्ये ‘नरम-गरम’ चर्चा

‘या’ 4 ‘टॉप’ अभिनेत्रींनी केलं ‘डेटिंग’, मात्र अद्यापही आहेत अविवाहीत

Video : ‘तशा’ अवस्थेत नृत्य करून प्रियंका चोपडाने ‘हॉटनेस’च ‘दर्शन’ दिल्याने वातावरण ‘टाईट’

 

You might also like