Kapil Sibal In Supreme Court | ”शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी लवकर निर्णय द्या, कारण…”, कपिल सिब्बल यांचा SC मध्ये युक्तिवाद

नवी दिल्ली : Kapil Sibal In Supreme Court | नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे लवकर सुनावणी घ्यावी नाहीतर प्रकरण निरस्त ठरेल. उद्धव ठाकरेंकडेच पक्ष होता हे स्पष्ट आहे, असा युक्तिवाद आज ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात केला. उद्धव ठाकरेंनी आमदार अपात्रताप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी प्रसंगी ते युक्तिवाद करत होते. कपिल सिब्बल हे ठाकरे गटाच्या बाजूने तर हरिश साळवे (Adv Harish Salve) शिंदे गटाकडून युक्तिवाद करत आहेत. (Kapil Sibal In Supreme Court)

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी, शिंदे गट किंवा ठाकरे गट यापैकी कुठल्याही आमदाराला अपात्र न ठरवता शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असल्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाविरूद्ध उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सध्या या याचिकेवर सुनावणी सुरू आहे.

आज सुनावणीत शिंदे गटाचे वकील हरिश साळवेंनी युक्तिवाद करताना म्हटले की, ठाकरे गटाने जे दस्तावेज सादर केले ते खोटे आहेत. उद्धव ठाकरेंची नेमणूक करण्यासाठी प्रस्ताव कुणी मांडला ते बघा. त्यापैकी अनेकांचे म्हणणे आहे की ते स्वतः हजर नव्हतेच.

कायद्याचा प्रश्न नंतर आहे. राठोड, सावंत यांनी काय साक्षी नोंदवल्यात त्या पाहाव्यात.
ठाकरेंचा प्रस्ताव ज्यांनी सादर केले त्यापैकी अनेकजण बैठकीला उपस्थित नव्हते.
ठाकरेंच्या बरोबर किती आमदार होते यासाठी सादर केलेली कागदपत्रे विश्वासार्ह नाहीत, असे साळवे म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | पुणे जिल्हयातील हॉटेल, बार, परमिट रूम, रेस्टॉरंट रात्री 12.30 ला बंद करा, निवासी उपजिल्हाधिकार्‍यांचा आदेश

सन 2024- 25 या वर्षीचे पुणे महापालिकेचे 11 हजार 601 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर; समाविष्ट गावांतील विकासासाठी 550 कोटी रूपयांची भरवी तरतूद

जिल्ह्यात अवैध धंदे रोखण्यासाठी धडक कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पथारी व्यावसायीकांना देण्यात आलेल्या ‘फेरीवाला प्रमाणपत्रा’ची विक्री बेकायदेशीर

Prakash Ambedkar On Maha Vikas Aghadi Meeting | मविआची बैठक सकारात्मक, प्रकाश आंबेडकरांच्या चेहऱ्यावर हास्य! पुढील बैठकीत जागावाटपाचा अंतिम निर्णय

Indrani Balan Foundation | भारतीय सेना, इंद्राणी बालन फाऊंडेशनमुळे बारामुल्लातील डगर परिवाराच्या विद्यार्थ्याला मिळाले जीवनदान (Video)

माथाडीच्या नावाखाली पैशांची मागणी करणार्‍यांवर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून कारवाई

Pune Mundhwa Police | मुंढवा पोलिसांकडून नियमभंग करणार्‍या रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई

MP Supriya Sule | संपूर्ण पवार कुटुंब सुप्रिया सुळेंच्या बाजूने, म्हणाल्या ”हे सगळे बहिणीसाठी….”