‘मतदारांचा सन्मान करा’; ‘त्या’ वक्तव्यानंतर राहुल गांधींना सिब्बल यांचा सल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी जाहीरसभेत एक वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी राहुल गांधी यांना एक महत्वाचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, की ‘आपल्याला मतदारांचा सन्मान असायला पाहिजे. मग ते उत्तरपासून असो किंवा दक्षिण पण मतदारांचा सन्मान केला पाहिजे. मतदार समजदार असतात. त्यांना त्यांचे अधिकारांविषयी माहिती असते. कोणाला मत करायचं आणि कसे मतदान करायचे हे त्यांना माहिती असते’.

त्रिवेंद्रममध्ये एका जाहीरसभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी म्हटले होते, की यापूर्वी 15 वर्षांत उत्तर भारतातून खासदार झालो. त्यामुळे मला वेगळ्या प्रकारच्या राजकारणाची सवय झाली होती. माझ्यासाठी केरळमध्ये येणं हा नवा अनुभव होता. कारण मी पाहिले की लोक मुद्द्यांवर रस दाखवतात. फक्त दिखावा म्हणून नाही तर त्यावर गांभीर्याने याचा विचार करतात.

या वक्तव्यानंतर राहुल गांधी यांना कपिल सिब्बल यांनी सल्ला दिला आहे. ते म्हणाले, आपल्याला मतदारांचा सन्मान पाहिजे. मग ते उत्तरपासून असो किंवा दक्षिण पण मतदारांचा सन्मान केला पाहिजे. मतदार समजदार असतात. त्यांना त्यांचे अधिकारांविषयी माहिती असते. कोणाला मत करायचं आणि कसे मतदान करायचे हे त्यांना माहिती असते.

…तर मग गांधी परिवार उत्तर भारतात राजकारण का करतात

राहुल गांधी यांच्या विधानानंतर भाजप नेत्या आणि केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनीही निशाणा साधला. त्या म्हणाल्या, गांधी परिवारात उत्तर भारतीयांबाबत हीन भावना आहे तर हे लोक उत्तर भारतात राजकारण का करत आहेत.