शाळा सुरु करण्याबाबत संभ्रम ; 400 पेक्षा शिक्षकांना ‘कोरोना’ची बाधा

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – मुंबई, ठाणे आणि पुणे वगळता सोमवारपासून राज्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याची तयारी पूर्ण झाली असतानाच नवे संकट उभे राहिले आहे. शाळा सुरु होण्यापूर्वी शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्याची सक्ती करण्यात आली होती. त्यामध्ये अनेक ठिकाणी शिक्षकच कोरोनाबाधित आढळून आले आहेत. सध्या हि संख्या ४०० च्यावर आहे. त्यामुळे आता शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक पातळीवर संभ्रम निर्माण झाला आहे.

बाधित शिक्षकांची सर्वाधिक संख्या विदर्भात असून तेथे २०० शिक्षक कोरोनाबाधित आढळले आहे. मराठवाड्यात ९७, खान्देश २३ तर पश्चिम महाराष्ट्रत १३२ शिक्षक बाधित आढळले. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबईमध्ये शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र तेथे टेस्टमध्ये एकही शिक्षक कोरोनाबाधित आढळला नाही.

शाब्बास सोलापूरकर!
शाळा सुरु करण्यास सोलापूरमध्ये उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. तब्बल ८२ टक्के पालकांनी शाळा सुरु करण्यासाठी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड़ यांनी शाब्बास सोलापूरकर अशा शब्दात पालकांचे आभार मानले आहे.

शाळांमध्ये सोयीं सुविधांचा अभाव
शाळा सुरु करण्याबाबत काही संस्थाचालक तसेच पालक तयार नाहीत. कारण शाळेमध्ये कोरोना प्रतिबंधक साधनांची पूर्तता कोण करणार असा मोठं प्रश्न निर्माण झाला आहे. एवढेच नाही तर काही शिक्षकांनी थर्मल स्कॅनींगने कोरोना बांधित आढळून येईल का असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

पुण्यातील शाळा १३ डिसेबरपर्यंत बंद
पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे, त्यामुळे १३ डिसेंबरपर्यंत शाळा सुरु न करण्याचा निर्णय घेतल्याचे पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. रुग्णसंख्या आणि पालकांशी चर्चा करून शाळा सुरु करण्याचा निर्णय पुढील काळात घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले.

रेमडेसिवीर हे औषध महाराष्टरातील रुग्नांणा उपयोगी ठरत आहे. त्यामुळे ते बंद करून चालणार नाही. २७ नोव्हेबर मुंबईसह राज्यात रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे.
डॉ. संजय ओक, अध्यक्ष टास्क फोर्स.