कर्नाटकचे राज्यपाल भाजपच्या बाजूने – राज ठाकरे

रायगड : पोलीसनामा ऑनलाईन

कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला हे गुजरातचे असून, ते नरेंद्र मोदी यांचे खास आहेत. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी आपली जागा सोडली होती. वजुभाई वाला हे नरेंद्र मोदी यांच्या संपर्कातले आहेत. त्यामुळे साहजिकच ते भाजपला झुकते माप देतील त्यामुळे ते भाजपच्या बाजूनेच वागतील असा घणाघाती आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.

कर्नाटकात भाजपचे बहुमत हुकल्यामुळे काँग्रेस आणि जेडीएसने सत्ता स्थापनेसाठी दावा केल्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. कर्नाटकमध्ये सत्तेसाठी भाजपचा आटापिटा सुरु आहे. जेडीएस आणि काँग्रेसचे सरकार स्थापन होत आहे. पण तरीही त्यांना संधी दिली जात नाही. गोवा, मणिपूरमध्ये भाजपने कमी जागा असून सुद्धा सत्ता स्थापन केली. जे तिथे झाले होते तसे इथे का होत नाही असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला.