कर्नाटकचे मंत्री आ. प्रभू चव्हाण यांचा उदगीर येथे सत्कार

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे दिनांक 27/09/2019 रोजी लातूर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे विधानसभा प्रभारी म्हणून कर्नाटकचे पशुसंवर्धन व अल्पसंख्याक कॅबिनेट मंत्री बिदर जिल्ह्यातील औराद बाराळी तालुक्याचे सतत तीन टर्म (15) वर्षापासून आमदार असलेले प्रभू चव्हाण यांची लातूर जिल्ह्याचे विधानसभेचे प्रभारी म्हणून भारतीय जनता पार्टीकडून नियुक्ती करण्यात आली आहे. या बैठकीस लातूर येथे जात असताना उदगीर येथे भारतीय जनता पार्टीचे लातूर जिल्हाध्यक्ष तथा गोदावरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नागनाथ निडवदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील औराद बाराळी तालुक्‍याचे भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य व बिदर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सोबत होते.

आमदार प्रभू चव्हाण यांचा नागनाथ अण्णा निडवदे यांच्या उदगीर येथील निवासस्थानी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून व उदगीरचे इच्छुक उमेदवाराकडून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी उदगीर नगर परिषदेचे सदस्य नागेश अष्टूरे, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेशदादा बोथीकर, पिंपरी गावचे कार्यकारी सोसायटीचे चेअरमन तथा लातूर जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष शिवशंकर पांडे, उदगीर भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा उदगीर तालुका सरचिटणीस अमित बोळेगावे, उदगीर येथील भाजपाचे बंजारा समाजातील नेते बापूराव राठोड, उदगीर विधानसभा राखीव मतदार संघाचे इच्छुक उमेदवार डॉ. अनिल कांबळे, प्रा. पंडित सूर्यवंशी आदी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थितीत होते.

यावेळी बापू राठोड यांच्या निवासस्थानीही सत्कार करण्यात आला. आमदार प्रभू चव्हाण यांचा लातूर जिल्ह्यात व उदगीर परिसरात मोठा जनसंपर्क असून येत्या विधानसभा निवडणुकीत यांचा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला निवडणूकीत निवडून येण्यास चांगला फायदा होणार आहे.

Visit : Policenama.com