साराच्या घरी ‘स्पॉट’ झाला कार्तिक आर्यन, लपण्याचा प्रयत्न केला परंतु …

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री सारा अली खान ही ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये कार्तिक तिचा क्रश असून त्याला डेट करायला आवडेल असे तिने म्हटले होते. त्यानंतर त्या दोघांच्या अफेअरची चर्चा खुप गाजली. पण कार्तिक या गोष्टींना नाकारत असल्याचे समजते. तो अजूनही मी सिगंलच असल्याचे सांगत आहे. मग दोघांचे अफेअर नाही तर कार्तीक साराच्या घरी काय करत आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. कार्तीकने सगळ्यांना सिंगल असल्याचे सागिंतले असेल तरी, तो कॅमेरामध्ये साराच्या घरातजवळ दिसून आला आहे.
https://www.instagram.com/p/Bw6mjTxjLal/?utm_source=ig_embed

अनेकदा कार्तिक ने सोशल मिडीयाच्या माध्यमातून स्वतःला लपविले आहे. मात्र यावेळी कार्तीक साराच्या घरी कॅमेऱ्यात कैद झाला आहे. साराच्या घराबाहेरील फोटो सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये कोणी ओळखू नये म्हणून त्याने स्वतःच्या चेहऱ्यावर हात ठेवला आहे. त्याचबरोबर त्याने काळ्या रंगाचा ट्रॅकसुट परिधान केल्याचे फोटोत दिसते.

https://www.instagram.com/p/Bw6mjTxjLal/?utm_source=ig_embed

असे होऊन ही कार्तिक सगळ्यांना मी सिंगल असल्याचे सांगतो. शिवाय त्याला लवकरच मिंगल व्हायला आवडेल हे सांगायला तो विसरत नाही. सध्या ते दोघे इम्तियाज अलीच्या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. शुटिंग दिल्लीमध्ये पुर्ण झाले आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना कार्तिक व सारा रोमॅन्स करताना दिसणार आहे. या दोघांचे फोटो व व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. सारा आणि कार्तिक सध्या ‘लव आजकल 2’ शुटींगमध्ये व्यस्त आहे. सारा व कार्तिक ची मौज, मस्ती व धमाल केलेला व्हिडीओ पहायला मिळत आहे.