Kartik Aaryan | ‘भूल भुलैय्या 3’चा टीझर आउट; ‘या’ दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

पोलीसनामा ऑनलाइन टीम : 2007 साली ‘भूल भुलैय्या’ (Kartik Aaryan) हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याने सिनेमागृहात धुमाकूळ घातला. या चित्रपटात अक्षय कुमारने मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर तब्बल 14 वर्षांनी या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच ‘भूल भुलैय्या 2’ प्रदर्शित झाला. या चित्रपटात कार्तिक आर्यन हा मुख्य भूमिकेत झळकला होता. कोरोना कालावधीनंतर ‘भूल भुलैय्या 2’ हा पहिला चित्रपट होता आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट देखील ठरला. आता या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘भूल भुलैय्या 3’ (Kartik Aaryan) या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे.
‘भूल भुलैय्या 2’ या चित्रपटात कार्तिक आर्यन बरोबर कियारा आडवाणी
आणि तब्बू या मुख्य भूमिकेत झळकल्या होत्या. ‘भूल भुलैय्या 3 मध्ये देखील कार्तिक आर्यनच मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
कार्तिकने या आगामी चित्रपटाचा टिझर त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

कार्तिक आर्यनने शेअर केलेल्या टिझरमध्ये दिसत आहे की सुरुवातीला हवेली दाखवण्यात आली आहे.
त्यानंतर कार्तिकचा आवाज ऐकू येतो आणि त्यात तो म्हणतो “काय वाटलं कहानी संपली?
काही दरवाजे बंद अशासाठी होतात की कदाचित ते पुन्हा त्या दरवाजांना आपण उघडावे”. यानंतर या चित्रपटातील ‘आमी जे तोमार’
हे गाणं वाजायला लागते आणि रुह बाबाची झलक पाहायला मिळते.
यात कार्तिक आर्यन रूह बाबाच्या वेशात दिसतो आणि तो म्हणतो मी आत्म्याशी फक्त बोलणारच नाही तर आत्मा माझ्या शरीरातही प्रवेश करणार आहे. (Kartik Aaryan)

कार्तिक आर्यनने हा टिझर शेअर करत लिहिले की “दिवाळी 2024 ला रूह बाबा परत येतोय”.
आता कार्तिकच्या या कॅप्शनने स्पष्ट झाले आहे की हा चित्रपट दिवाळीला प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘भूल भुलैय्या 2’ प्रमाणेच दिग्दर्शक अनीस बज्मी करणार आहेत.
आता या चित्रपटाचा टीझर पाहून प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे.

Web Title :- Kartik Aaryan | kartik aaryan shared teaser of his upcoming film bhool bhulaiyya 3

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supreme Court | मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीवर सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निकाल, समिती नेमण्याचे आदेश

Pune Kasba Peth Bypoll Election | ‘आम्ही परावभवाचे आत्मचिंतन करू’; देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

Jalgaon Crime News | झोपेच्या नादात गच्चीवरुन खाली पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; जळगावमधील घटना