Pune Kasba Peth Bypoll Election | ‘आम्ही परावभवाचे आत्मचिंतन करू’; देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | भारतीय जनता पार्टीचा (BJP) बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या कसबा विधानसभा संघात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) सुरूंग लावला आहे. 28 वर्षांनंतर सत्ता पालट झाली आहे. पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपाच्या हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा 11040 मतांनी पराभव करून विजयाचा झेंडा फडकावला आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले की, आम्ही या पराभवाचे आत्मचिंतन करू. (Pune Kasba Peth Bypoll Election)

 

कसबा पोटनिवडणूक निकालानंतर विधान भवनात प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, आम्ही या पराभवाचे आत्मचिंतन करू, मात्र तुम्हाला देखील आत्मचिंतन करावं लागणार आहे तिन राज्यांच्या निवडणूका झाल्या काँग्रेस कुठे दिसतच नाहीये, त्यामुळे थोडं आत्मचिंतन नाना पटोले (Nana Patole) तुम्ही करा थोड आम्ही करू” अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी यांनी दिली आहे. तर कसबा निवडणूक निकालानंतर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयावर बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी “भाजपाची उलटी गिनती सुरू झाली आहे”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

 

कसबा पेठ मतदार संघात भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती.
कसब्यात रासने आणि धंगेकर याच्यात चुरशीची लढत झाली. भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा धक्कादायक रित्या पराभव झाला आहे.
‘काटे की टक्कर’ अशी ही लढत पाहिला मिळाली होती.
मात्र काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी ११०४० मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला आहे.

 

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | ‘Let us reflect on the experience of others’; Devendra Fadnavis’s first reaction

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kasba Bypoll Election Result | भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची मुसंडी, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 11 हजार मतांनी विजयी

Pune Crime News | पत्नीवर वार करणाऱ्या आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

SSC Exam | ऑल द बेस्ट! उद्यापासून 10 वीची परीक्षा सुरु, राज्यात 15 लाख 77 हजार विद्यार्थी देणार परीक्षा