Karuna Sharma | करुणा शर्मांना न्यायालयाकडून दिलासा नाहीच, ‘या’ कारणामुळं सुनावणी 18 तारखेला

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – करुणा शर्मा (Karuna Sharma) यांना अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणात (atrocity case) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial custody) अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली होती. अंबाजोगाईच्या जिल्हा सत्र न्यायालयात (District Sessions Court, Ambajogai) करुणा शर्मा यांच्या जामीन अर्जावर (bail application) आज (मंगळवार) सुनावणी होणार होती. परंतु ज्या न्यायालयासमोर ही सुनावणी होणार होती त्या न्यायालयाचे न्यायाधिश (Judge) रजेवर असल्याने आणि फिर्यादी पक्ष हजर नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही सुनावणी 18 सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे करुणा शर्मा (Karuna Sharma) यांना यापुढेही 18 तारखेर्यंत कोठडीतच रहावे लागणार आहे.

परळी येथील वैद्यनाथ मंदिर (Vaidyanath Temple Parli) परिसरात 5 सप्टेंबर रोजी दोन महिलांवर जातीवाचक शिवीगाळ करुन प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप शर्मा आणि अरुण दत्तात्रय मोरे (Arun Dattatraya More) यांच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात (Parli city police station) गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना तातडीने ताब्यात घेतले होते. सोमवारी त्यांना अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले होते. त्यावेळी शर्मा यांना न्यायालयीन कोठडी तर अरुण मोरे याला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मंगळवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने मोरेची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. सध्या दोन्ही आरोपी बीडच्या जिल्हा कारागृहात (District Jail, Beed) आहेत.

आरोपींनी वकिलामार्फत अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. मात्र, दरम्यानच्या काळात सुट्या येत असल्याने त्यांच्या अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार होती. मात्र, आज न्यायाधिश रजेवर असल्याने आणि फिर्यादी पक्ष हजर नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलली आहे.

काय आहे प्रकरण ?
करुणा शर्मा बीडमध्ये असताना त्यांच्या गाडीत पिस्तूल (Pistol) आढळून आले होते.
यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.
6 सप्टेंबरला पोलिसांनी करुणा शर्मा यांना न्यायालयात हजर केले.
तेव्हा न्यायालयाने त्यांची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.
तर त्यांच्या ड्रायव्हरला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

Web Titel :- Karuna Sharma | karuna sharmas stay in jail has been extended now the next hearing is on the 18th

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sangli Crime | सांगलीतील बडया व्यावसायिकाची कोटयावधी रूपयांची फसवणूक, दुबईतील चौघांविरूध्द गुन्हा

BPCL Recruitment 2021 | भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 87 जागांसाठी भरती, जाणून घ्या

Amruta Fadnavis | ‘मी एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून बोलते, विचार मांडते’; अमृता फडणवीस यांनी उलगडलं त्यांचं जगण्याचं आणि कामाचं पॅशन