काश्‍मीर लोकांसाठी पाकिस्तानची सीमा खुली करा – मेहबूबा मुफ्ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काश्मीरच्या लोकांनी पाकिस्तानच्या संदर्भांत कोणतीही भाष्य केले कि ते भारताच्या विरोधातील आहेत असा समज करण्यात येतो म्हणून आम्ही काय बोलावे कि नाही असे वाटते.  करतापुरमध्ये शीख भाविकांसाठी सीमा खुली करण्यात आली त्याप्रमाणे कश्मीरी लोकांनाही भारत पाकिस्तान सीमा खुली करा असे जम्‍मू – काश्‍मीरच्‍या माजी मुख्‍यमंत्री मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या आहेत. तसेच ‘कश्मीर प्रश्न फक्त चर्चेनेच सुटू शकतो’ या पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या वक्तव्याचा त्यांनी हि पुनरोच्चार केला आहे.

ऑब्‍जर्वर रिसर्च फाउंडेशनतर्फे आयोजित करण्‍यात आलेल्‍या  ‘द वे फॉरवर्ड’ या कार्यक्रमात त्यांना आमंत्रित करण्यात आले होते तेव्हा त्या बोलत होत्या. २००२ साली तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी  यांनी कश्मीर प्रश्नावर चर्चा घडवून येण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्यांच्या प्रयत्नांना दुर्दैवाने यश आले नाही त्यानंतर २०१४ साली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्या नंतर अशी अशा जागी झाली होती ती पाकिस्तानशी चर्चा करून काश्मीर प्रश्नावर आपणाला तोडगा काढता येऊ शकेल. परंतु नरेंद्र मोदी यांनी या प्रश्नी कसलीही तत्परता दाखवली नाही उलट त्यांनी काश्मीर मधील हिंसाचाराकडे कानाडोळा करत काश्मीरचा प्रश्न चिगळत ठेवला. तसेच कश्मीर हे मुस्लिम बहुल राज्य असून त्यातील मुस्लिमांना फुटीरतावादी लोकांकडून  भडकवण्यात येते म्हणून इतर राज्यांच्या प्रमाणे काश्मीर  राज्याकडे पाहून जमणार नाही.  पाकिस्‍तानचे नवीन पंतप्रधान इम्रान खान यांनी चर्चेचा मार्ग खुला केला असून भारताने हि त्या कडे त्या भावनेने बघण्याची गरज आहे असे मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या आहेत.

सार्क संघटनेने आपल्या दोन सदस्य  राष्ट्रांमधील कश्मीर प्रश्न मिटवण्यासाठी मदत करावी असे  मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या. कश्मिरी पंडित कश्मीर मध्ये पुन्हा माघारी यावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. कश्मिरी पंडित हे काश्मीरचा अविभाज्य घटक आहेत. त्यांच्या काश्मीर  सोडून जाण्याने काश्‍मीरमधील शिक्षण, संस्‍कृती आणि कुटीर उद्योगात मोठे नुकसान झाले असून  काश्‍मीरी पंडितांचे महत्त्‍वपूर्ण योगदान विसरता नयेणारे आहे. त्याच प्रमाणे कश्मिरी पंडितांनी कश्मीर सोडल्याने काश्मीरचे सौंदर्य  हरपले आहे असे  मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या आहेत.