Kasturi Educational Institution | ‘कस्तुरी स्कुल ऑफ लॉ’तर्फे 14 ते 19 फेब्रुवारी दरम्यान मोफत कायदेविषयक सल्ला मार्गदर्शन सप्ताहाचे आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Kasturi Educational Institution | कस्तुरी शिक्षण संस्था (Kasturi Educational Institution) संचालित ‘स्कूल ऑफ लॉ’ तर्फे (School Of Law) संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून 14 ते 19 फेब्रुवारी 2022 या कालावधीत सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत मोफत कायदेविषयक सल्ला मार्गदर्शन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक डॉ. पंडित पलांडे (Dr. Pandit Palande) यांनी दिली. अधिकाधिक नागरिकांनी या सप्ताहात सहभागी होऊन आपल्या कायदेविषयक शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

”कौटुंबिक हिंसाचार, वैवाहिक मतभेद, घटस्फोटित महिलांच्या समस्या, महिलांचे हक्क व अधिकार, लहान मुलांच्या समस्या, लहान मुलांचे हक्क व अधिकार, एकेरी पालकत्व, वारसा हक्क विषयी वाद, मृत्युपत्र, पॉवर ऑफ अटर्नीय, कामगार व मालकांचे हक्क आणि कायदे, बौद्धिक संपदा हक्क व कायदा अशा विविध विषयांवर या सप्ताहात मार्गदर्शन केले जाणार असल्याचे,” संस्थेच्या अध्यक्षा व प्राचार्य डॉ. जयश्री पलांडे (Dr. Jayashree Palande) यांनी सांगितले. (Kasturi Educational Institution)

 

File photo

”कायद्यासंदर्भात नागरिकांच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी व त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी मोफत कायदेविषयक सल्ला व सहाय्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात विविध प्रकारचे वाद मिटविण्यासाठी मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे,” असे संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. प्रतीक पलांडे (Dr. Prateek Palande) यांनी नमूद केले. मोफत नाव नोंदणीसाठी https://docs.google.com/forms/d/1A4N5yuc4tX5q0k-2iD2eLlPCXShRFXFOhpfj9wjxoE8/prefill  यावर भेट द्यावी.

 

”एनजीओ, पोलीस, महिलांचे अधिकार, विद्यार्थ्यांच्या समस्या, ग्राहक कायदा, कंपन्यांमधील कामगार, शेतीविषयक कायदे, मालमत्ता व जमीनविषयीचे वाद, भाडेकरूंच्या समस्या आदी विषयांवर मार्गदर्शन मिळणार असल्यामुळे नागरिकांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी 9022034380 या क्रमांकावर किंवा कस्तुरी शिक्षण संस्थेचे स्कुल ऑफ लॉ, शिक्रापूर, ता. शिरूर येथे संपर्क साधावा,” असे आवाहन उपप्राचार्य डॉ. सपना देव (Deputy Principal Dr. Sapna Dev) यांनी केले आहे.

 

Web Title : Kasturi Educational Institution | Kasturi School of Law organizes free legal counseling week from 14th to 19th February

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | खळबळजनक! उरुळी कांचन येथे सापडले छाटलेल्या मृतदेहाचे शीर व हाताचा भाग

 

Brata Virus Alert For Android | केवळ एका चुकीने रिकामे होईल बँक खाते, Android यूजर्सला घाबरवण्यासाठी आला BRATA Virus

 

ST Workers Strike | एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच राहणार, विलीनीकरणाबाबत मोठी माहिती आली समोर