Katrina Kaif | ‘या’ अभिनेत्याचा वाईट वागणुकीमुळं सलमान खान समोर रडली कतरिना, जाणून घ्या कोण होता तो अभिनेता?

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Katrina Kaif | बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. परंतु काही दिवसांपूर्वी तिला एका वाईट संकटाचा सामना करावा लागला होता. तसेच (Bollywood) बॉलीवूडमध्ये करिअर घडवत असताना अनेक कलाकारांना अशा संकटांचा सामना करावा लागतो त्यातच म्हणजे कतरिना कैफ (Katrina Kaif) ही एक होती.

 

एकेकाळी अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) जॉन अब्राहम (John Abraham) सोबत ‘साया’ या चित्रपटात काम करणार होती. परंतु जॉनने तिला साया चित्रपटातून बाहेर जाण्याचा रस्ता दाखविला आणि अभिनेत्री तारा शर्मा हिची निवड केली. मात्र या घटनेनंतर कतरिना वर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यामुळे तिला प्रचंड प्रमाणात वाईट वाटलं, असं सलमान खानने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.

 

“कतरिना एकदा रडत माझं करिअर संपलं असं म्हणत होती. तेव्हा मी तिला म्हणालो, तु का रडत आहेस? पुढे जाऊन तुला जेव्हा हे दिवस आठवेल, तेव्हा तु पोट धरून हसशील. एकेकाळी तु मोठी हिरोइन होणार आहेस.” असं सलमान खान कतरिनाला म्हणाला.
अखेर (Salman Khan) सलमानचे हे शब्द अगदी खरे ठरले.

 

दरम्यान, नंतर कतरिनाने जॉन सोबत ‘न्यू यॉर्क’ या चित्रपटात देखील काम केलं.
तर आज कतरिनाला देशात एक प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये ओळखले जाते.
त्यानंतर कतरिनाने ‘एक था टायगर’ ‘टायगर जिंदा है’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’,
‘मेरे ब्रदर की दुल्हन’, ‘भारत’ आणि ‘जग्गा जासूस’ असे अनेक हिट चित्रपट मध्ये काम केलं

 

Web Title :- Katrina Kaif | katrina kaif started crying in front of salman because of the actors bad deeds

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा