धक्कादायक ! RTO अधिकार्‍याकडून पत्नीचा 10 लाखांच्या गाडीसाठी छळ, नवविवाहितेची आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – RTO अधिकारी पतीकडून 10 लाखांच्या गाडीसाठी होणारा छळ (Newlyweds harassed rs 10 lakh vehicle rto officer) अन् मारहाणीला कंटाळून अवघ्या तीन महिन्यापूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेने ( Newlyweds) आत्महत्या (Suicide) केली आहे. केरळच्या ( Kerala) कोलम जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीकडून झालेल्या मारहाणीनंतर शरीरावर झालेल्या जखमांचे फोटो माहेरच्यांना पाठवत विवाहितेने आपल्या जीवनाचा शेवट केला आहे. या प्रकरणी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

विस्मया नायर (वय 22) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. मात्र विस्मयाच्या वडिलांनी ही आत्महत्या नसून किरणकुमारनेच आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार पोलिसांनी पती किरण कुमारला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विस्मया हिचा केरळ मोटर वाहन विभागात सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या किरण कुमार यांच्याशी मार्च 2021 मध्ये विवाह झाला होता. लग्नात विस्मयाच्या वडिलांनी मानपान, गाडी, भेटवस्तू दिल्या होत्या. मात्र विस्मयाच्या वडिलांनी दिलेली गाडी न आवडल्याने दुसरी गाडी किंवा 10 लाख द्यावे अशी मागणी किरण कुमारने विस्मयाच्या कुटुंबीयांकडे केली होती. त्यातूनच किरणकुमारने पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण केली होती.

त्यामुळे विस्मया पतीचे घर सोडून माहेरी गेली होती. विस्मया बीएएमसच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. अंतिम परीक्षांच्या आधी किरणने तिला घरी येण्याची विनंती केली. आई-वडिलांच्या मर्जीविरुद्धच ती सासरी परत गेली. त्यानंतर किरणने पुन्हा तिचा छळ सुरु केला. एवढेच नाहीतर तिला पालकांशी बोलण्यासही मज्जाव केला. विस्मयाने परीक्षा देऊ नये, अशी तिच्या पतीची इच्छा होती. त्याने तिची परीक्षा फी भरण्यासही इन्कार केला होता.

शरीरावरील जखमांचे फोटो पाठवले बहिणीला

विस्मयाने रविवारी रात्री आपल्या बहिणीला व्हॉट्सॲप मेसेज करुन आपली स्थिती सांगितली.
शिवीगाळ करुन पती किरण कुमार आपल्यावर शारीरिक अत्याचार करत असल्याचा आरोप तिने मेसेजमध्ये केला होता.
त्यामुळे शरीरावर झालेल्या जखमांचे फोटोही तिने बहिणीच्या मोबाईलवर पाठवले होते.
त्यानंतर, दुसऱ्या दिवशी विस्मयाच्या मृत्यूची बातमी तिच्या कुटुंबीयांच्या कानावर आली.
या घटनेने विस्मयाच्या माहेरच्यांना मोठा धक्का बसला आहे.

Web Titel : kearala news newlyweds harassed rs 10 lakh vehicle rto officer arrested

हे देखील वाचा

Pimpri News | पहिला विवाह झाला असताना लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

‘डोंगर’ पोखरुन ‘उंदीर’ही नाही निघाला; परिवहन मंत्री अनिल परब यांना मोठा दिलासा

कोरोना झाल्यानंतर एवढ्या दिवसांपर्यंत शरीरात राहतात अ‍ॅन्टीबॉडी, वैज्ञानिकांनी सांगितलं

या’ 5 मसाल्यांना मिसळून बनवा इम्युनिटी बुस्टर काढा, जाणून घ्या कधी अन् कसा प्यायचा