उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल केडगावच्या महिला पोलीस छाया जगताप यांचा गौरव

दौंड प्रतिनिधी: पोलीसनामा आॅनलाईन

केडगाव येथील रहिवासी असणाऱ्या महिला पोलीस नाईक छाया ज्ञानेश्वर जगताप यांचा उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पुणेग्रामीण चे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यावतीने १५ ऑगस्ट रोजी प्रशस्ती पत्रक देऊन सत्कार करण्यात आला.
[amazon_link asins=’B07B6DM75J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7dd99219-a45b-11e8-86c4-69a87f07c060′]

छाया जगताप या महिला पोलीस नाईक म्हणून २००२ साली भरती झाल्या होत्या. त्यांनी दौंड, शिरुर, रांजणगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी काम केले असून सध्या त्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय दौंड येथे कार्यरत आहेत. आपण केलेल्या कार्याची दखल घेत पोलीस अधिक्षकांनी प्रशस्ती पत्रक देऊन गौरव केल्यामुळे मला यापुढे अजून चांगले काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे असे महिला पोलीस नाईक छाया जगताप यांनी बोलताना सांगितले.