WhatsApp अपडेट करत रहा, लवकरच मिळतील ‘हे’ 5 जबरदस्त फीचर्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वात प्रसिद्ध इंस्टंट मेसेजिंग सर्व्हीस व्हॉट्सॲप युजर्ससाठी खूप सारे नवीन फीचर्स आणत आहे. हे फीचर कोणते आहेत हे युजर्सला ॲप अपडेट केल्यानंतर कळणारच आहेत. मोबाईल ॲपशिवाय डेस्कटॉपवर सुद्धा काही फीचर्स टेस्ट केले जात आहेत.

1) ग्रुप कॉलसाठी वेगळी रिंगटोन – पुढील अपडेट्समध्ये व्हॉट्सॲप युजर्सला ग्रुप कॉल्ससाठी वेगळी रिंगटोन सेट करण्याचा ऑप्शन मिळू शकतो. यामुळं युजरला फोन न पाहताही कळेल की त्यांना ग्रुप कॉल आला आहे.

2) व्हॉट्सॲप डुडल्स – सुरुवातीला व्हॉट्स ॲप डुडल्स केवळ डेस्कटॉप किंवा वेब व्हर्जनवर मिळत होतं. परंतु फ्युचर अपडेट्सनंतर मेसेजिंग ॲप अँड्रॉईड व्हर्जनसाठी बॅकग्राऊंड डुडल्स घेऊन येऊ शकतं.

3) नवीन कॉलिंग युआय – पुढील अपडेटमध्ये नवीन आणि चांगला इंटरफेस पाहायला मिळू शकतो. यानंतर कॉल बटन खाली मुव्ह केले जाऊ शकते. कॉल इंटरफेसमध्ये इंफो बटन, ऑडिओ बटन आणि व्हिडीओ बटन सुद्धा कॅमेरा आणि मेसेजिंग बटनसोबत दिसेल.

4) ॲनिमेटेड स्टीकर्स – व्हॉट्सॲपवर चॅटींग एक्सपिरीयंस आणखी चांगले करण्यासाठी युजर्सना लवकरच ॲनिमेटेड स्टीकर्स मिळू शकतात. कंपनी या स्टीकर्सला टेस्ट करत आहे. खूप मेसेजिंग ॲपमध्ये आधी हे फीचर दिलं जात होतं.

5) शॉर्टकट कॅटलॉग ॲक्सेस – व्हॉट्सॲप बिजनेस अकाऊंटवर युजर्सला कॅटलॉग फीचरचे शॉर्टकट ॲक्सेस मिळू शकते. तसेच पोर्टफोलियो पाहिले जाऊ शकते. तसेच नवीन कॉलिंग बटन देखील या फीचरला आणखी चांगलं करीत दिलं जाऊ शकतं.