सिगारेट सोडल्यानंतर वाचवलेल्या पैशांमधून साकारले घराचे स्वप्न !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – केरळमधील एका व्यक्तीला सिगारेट सोडल्याने झालेल्या आर्थिक फायद्यामधून चक्क मोठ्या घराचे स्वप्न पूर्ण करता आले आहे. कोझीकोडे येथे राहणार्‍या 75 वर्षीय वेणूगोपालन नायर यांनी 8 वर्षांपूर्वी सिगारेट सोडली. त्याआधी त्यांचा सिगरेटवर खूप मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होत होता. मात्र एका आरोग्य तपासणीनीनंतर त्यांनी सिगरेट सोडली. या निर्णयाचा त्यांच्या आरोग्याला तर फायदा झालाच शिवाय यातून त्यांना मोठा आर्थिक फायदाही झाला.

वेणूगोपालन नायर यांनी सिगारेट सोडल्यापासून 100 महिन्यांमध्ये (8 वर्ष 4 महिने) 5 लाख रुपयांची बचत केली आहे. 8 वर्षांपूर्वी त्यांनी सिगारेट सोडली नसती तर हे पैसेही खर्च झाले असते. बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणार्‍या वेणूगोपालन यांनी कुटुंबाच्या भविष्याच्या दृष्टीने बचत करण्याचा निर्णय घेतला. पत्नी आणि दोन मुलांचा विचार करुन त्यांनी सिगारेटसाठी खर्च होणारे पैसे बाजूला काढण्यास सुरुवात केली.

तरुण वयामध्ये सिगरेटचे व्यसन लागल्याने त्यांच्या आरोग्यावर या व्यसनाचे गंभीर परिणाम दिसू लागल्याचे त्यांना 65 व्या वर्षानंतर जाणवू लागले. मी वयाच्या 13 व्या वर्षांपासूनच लपूनछपून धुम्रपान करुन लागलो होतो. छातीत दुखू लागल्यानंतर मी काही चाचण्या केल्या आणि त्यामुळेच आज मी जिवंत आहे, असं वेणूगोपालन यांनी सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like