मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत सकल हिंदू समाजाच्या (Sakal Hindu Samaj) वतीने हिंदू जन आक्रोश मोर्चाचं (Hindu Janakrosh Morcha) आयोजन करण्यात आलं होतं. लव्ह जिहाद (Love Jihad), धर्मांतर (Conversion) आणि लॅण्ड जिहाद विरोधात कायदा (Law) राज्यासह संपूर्ण देशात लागू व्हावा, अशी मागणी मोर्चाच्या वतीने करण्यात आली. यावरुन ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. याला आता भाजप (BJP) प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सळसळत्या हिंदुत्वाचं (Hindutva) हुंकार समोर आहे पण त्याला साथ देता येत नाही, असे म्हणत केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी जोरदार पलटवार केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
देशात नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) या दोन शक्तिमान नेत्यांचं राज्य आहे. महाराष्ट्रात सुद्धा हिंदूंचं राज्य आलं, असं म्हणण्यात येत आहे. तरीही काढलेला आक्रोश मोर्चा योग्यच आहे. कारण हिंदू समजले जाणाऱ्या नेत्यांकडून न्याय मिळत नाही. म्हणून आक्रोश मोर्चा निघाला असेल तर त्याचे स्वागत केलं पाहिजे, असं संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना म्हटले होते.
संजय राऊतांचं ट्विट
काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित (Kashmiri Pandit) आक्रोश करत असून, न्याय मागत आहेत. मुलायमसिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांनी राम सेवकांवर गोळ्या चालवल्या. मोदी सरकारने त्यांचं पद्मविभूषणाने (Padma Vibhushan) गौरव केला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे. देशात हिंदू नेत्यांचं राज्य असताना, सुद्धा हिंदूंना आक्रोश करावा लागत आहे. हे हिंदूंच दुर्दैव आहे, अशी खंत संजय राऊतांनी व्यक्त केली.
शिवसेना भवन हेच हिंदूंचे एकमेव आशास्थान आहे हे आक्रोश मोर्चाने सिध्द केले. आठ वर्षा पासून शक्तिमान हिंदू नेत्यांचे राज्य असताना हिंदूंना आक्रोश करावा लागतो हे अपयश कोणाचे?काश्मिरात पंडितांचा आक्रोश. करसेवकाच्या हत्या करणारया
मौ. मुलायम यांना पद्मविभूषण
हिंदू आक्रोश करणारच! pic.twitter.com/F7hcXK4QG0— Sanjay Raut (@rautsanjay61) January 29, 2023
शिवसेना भवन हतबद्ध अन् हळहळत असेल
संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना केशव उपाध्ये (Keshav Upadhye) म्हणाले,
पहिल्यांदाच शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) हतबद्ध अन् हळहळत असेल.
आज सळसळत्या हिंदुत्वाचं हुंकार समोर आहे पण त्याला साथ देता येत नाही, कारण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)
यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं आणि आजच मुस्लिमांची परिषद घेणाऱ्यांच्या शरद पवारांच्या (Sharad Pawar)
राष्ट्रवादीच्या (NCP) दारात नेऊन ठेवलं. बाकी हिंदू समर्थ आहेत, असं ट्विट उपाध्ये यांनी केलं आहे.
पहिल्यांदा शिवसेना भवन हतबद्ध अन हळहळत असेल आज. सळसळत्या हिंदुत्वाचं हुंकार समोर आहे पण त्याला साथ देता येत नाही कारण उध्दव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडल आणि आजच मुस्लिमांची परिषद घेणाऱ्यांच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या दारात नेऊन ठेवल. बाकी हिंदू समर्थ आहे. https://t.co/RwYHWF4NrN
— Keshav Upadhye (@keshavupadhye) January 29, 2023
Web Title :- Keshav Upadhye | keshav upadhye responded to sanjay raut criticism of bjp over hindu jan awach morcha
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Lingayat Samaj Protest | मुंबईतील लिंगायत समाजाचा मोर्चा स्थगित, 70 ते 80 टक्के मागण्या पूर्ण