Supriya Sule | धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या संत तुकाराम महाराजांवर केलेल्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या…

0
432
Supriya Sule | Supriya Sule got angry over Dhirendra Krishna Shastri's statement on Saint Tukaram Maharaj; said...
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Supriya Sule  | अंधश्रद्धा निर्मुलन समितीने चमत्कार सिध्द करून दाखवावेत. असे खुले आव्हान दिल्यानंतर नागपूर येथील कार्यक्रम अर्धवट सोडून रायपूरला पाचारण करण्यात आलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी संत तुकाराम महाराज (Saint Tukaram Maharaj) यांच्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. विविध राजकीय नेते आणि वारकरी समुदायाकडून धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात येत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या त्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला.

 

माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या विधानाचा जाहीर निषेधच झाला पाहिजे. जे लोक असे बोलतात ते अर्थातच चुकीचं आहे. मी अध्यात्माकडे वळलेले आहे. मी अध्यात्म करते म्हणजे माझ्या घरात वाईट आहे असे नाही. हे भारतीय संस्कार आहेत. हे संस्कार आपल्या मुलांवर करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तुकाराम महाराजांचा अंधश्रद्धापमान केला जात असेल तर एक समाज म्हणून आपण त्याचा निषेध केला पाहिजे.’ असं यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यात ते म्हणत आहेत की, ‘संत तुकाराम महाराज महाराष्ट्रातील एक महात्मा आहेत. त्यांची पत्नी त्यांना रोज मारहाण करायची. याच कारणामुळे त्यांना एका व्यक्तीने विचारले की तुमची पत्नी तुम्हाला रोज मारहाण करते, मग तुम्हाला वाईट वाटत नाही का? या प्रश्नाचे संत तुकाराम महाराजांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, देवाची कृपा आहे की मला मारहाण करणारी पत्नी भेटली. मला प्रेम करणारी पत्नी भेटली असती, तर मी देवाच्या प्रेमात पडलोच नसतो. मी पत्नीच्याच प्रेमात गुरफटून गेलो असतो. मला मारहाण करणारी बायको मिळाली आहे, त्यामुळे मला प्रभू राम यांची भक्ती करण्याची संधी मिळते, असे संत तुकाराम महाराज म्हणाले होते. ‘ असे वक्तव्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी संत तुकाराम महाराज यांच्यावर केले होते.

त्यावर महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय (Warkari Sect Of Maharashtra) प्रचंड आक्रमक झाला आहे.
यावर बोलताना भाजप अध्यत्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले (Tushar Bhosale)
यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.
तुषार भोसले म्हणाले, ‘बागेश्वर धाम तथा धीरेंद्र शास्त्री यांनी तुकाराम महाराजांबद्दल बोलताना एक चुकीचा संदर्भ दिला आहे.
त्यातून संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या धर्मपत्नींच्या प्रतिमेला ठेच पोहोचली आहे.
हा फक्त संत तुकाराम महाराज नव्हे तर सबंध महाराष्ट्राचा अपमान आहे.
त्यामुळे आम्ही मागणी करतो की धीरेंद्र शास्त्री यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची तसेच महाराष्ट्राची माफी मागावी.’

 

तर संपूर्ण महाराष्ट्रभरातून धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या या वक्तव्याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.
तसेच धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी जाहीर माफी मागावी. अशी मागणी केली जात आहे.

 

Web Title :- Supriya Sule | Supriya Sule got angry over Dhirendra Krishna Shastri’s statement on Saint Tukaram Maharaj; said…

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mahesh Landge | चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवरून आमदार महेश लांडगेंची सर्वपक्षीयांना भावनिक साद; म्हणाले…

Supriya Sule | ‘वंचित’ सोबतच्या युतीबाबत स्पष्टचं बोलल्या सुप्रिया सुळे; म्हणाल्या…

Amar Mulchandani ED Raid | कट रचून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी अमर मूलचंदानी याच्यासह 6 जणांविरुद्ध ईडीकडून स्वतंत्र FIR