Ketaki Chitale | केतकीच्या ‘त्या’ वादग्रस्त पोस्ट बाबत पोलीस तपासात मोठी माहिती आली समोर, ती पोस्ट…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केतकी चितळेने (Ketaki Chitale) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर केलेल्या वादग्रस्त पोस्ट (Controversial Post) नंतर राज्यातील वातावरण चांगलच तापलं आहे. पोलिसांनी केतकी चितळेवर (Ketaki Chitale) गुन्हा (FIR) दाखल करुन तिला अटक (Arrest) केली आहे. दरम्यान पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये केतकीने केलेली वादग्रस्त पोस्ट ही 2020 सालची असल्याचे समोर आले आहे. त्यावेळी ही पोस्ट जास्त व्हायरल झाली नव्हती. मात्र, आता ती रीपोस्ट (Repost) करुन व्हायरल (Viral) करण्यामागे काही षडयंत्र आहे का याचा तपास ठाणे पोलीस (Thane Police) करीत आहेत. याबाबतचे वृत्त एका वृत्तवाहीनीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

 

दोन वर्षापूर्वी शरद पवारांबद्दल करण्यात आलेली पोस्ट जास्त व्हायरल झाली नाही.
त्यामुळे आता ती केतकी चितळेच्या (Ketaki Chitale) माध्यमातून व्हायरल करण्यात आली.
केतकी चितळे अनेकदा वादात सापडली आहे. पवारांबद्दलची पोस्ट तिनं केल्यानंतर गदारोळ झाला. त्यामुळे 2 वर्षापूर्वी जे घडलं नाही, ते आता घडलं. हे घडवण्यासाठीच दोन वर्षापूर्वीची पोस्ट तिनं रिपोस्ट केली होती, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.

दरम्यान, शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला अटक करण्यात आली आहे.
केतकीविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात (Kalwa Police Station) कलम 500, 505 (2), 501 आणि 153 ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके (Swapnil Netke) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
यानंतर पुण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत.
राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुणे सायबर पोलिसांकडे (Pune Cyber Police) तक्रार दाखल केली आहे.

 

Web Title :- Ketaki Chitale | ketaki chitale viral facebook post on ncp sharad pawar is two years before 2020 thane police investigation

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा