Aba Bagul | भविष्यातील पाणी प्रश्नावर मात करण्यासाठी ‘पीपीपी’ तत्वावर धरणे उभारावीत, काँग्रेसचे माजी गटनेते आबा बागुल यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सद्यस्थितीत पाणी प्रश्न हा दिवसेंदिवस बिकट होत आहे. भविष्यात पाण्यावरून युद्धजन्य स्थिती होईल. त्यामुळे सद्यस्थितीत असणारी धरणे (Dam), त्यातील पाणीसाठा (Water Storage) आणि लोकसंख्या (Population) प्रमाण हे पाहता, भविष्यात ही धरणे आणि त्यातील पाणीसाठा निश्चितच अपुरा पडणार आहे. त्यामुळे यावर आतापासूनच प्रभावी पर्यायी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न आणि नियोजन करावे लागणार आहे. त्यासाठी ‘पीपीपी’ तत्वावर (PPP Basis) धरणे उभारणे ही काळाची गरज आहे आणि त्याला चालना देण्याचे धोरण आखण्याची गरज असल्याचे काँग्रेसचे (Congress) माजी गटनेते आबा बागुल (Aba Bagul) यांनी म्हटले. आबा बागुल (Aba Bagul) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना याबाबत निवेदन दिले आहे.

आबा बागुल (Aba Bagul) यांनी निवेदनात म्हटले की, पुणे शहराबाबत (Pune City) बोलायचे झाले तर, राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुण्याने मुंबईलाही मागे टाकले आहे. साहजिकच एक मोठे शहर म्हणून पुणे उदयास येत आहे. आता तर विस्तारणाऱ्या या शहराच्या गरजाही वाढल्या आहेत. विशेषतः पाणी हा प्रश्न आता जटिल बनला आहे. समाविष्ट गावांमुळे, पीएमआरडीएची (PMRDA) हद्द पाहता, 500 चौ. कि. मी ची भर पुण्याच्या क्षेत्रफळात पडली आहे. आज 700 चौ. कि. मी. क्षेत्रफळ झाले आहे. ज्यावेळी 110 चौ. कि. मी क्षेत्रफळ होते, त्यावेळी 11 टीएमसी पाणी लागत होते. आज पुण्याची लोकसंख्या 50 लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत धरणांतून मिळणारा 14 टीएमसी पाण्याचा कोटाही अपुरा पडत आहे.

उद्या पुण्याची लोकसंख्या अडीच कोटींपर्यंत पोहोचणार आहे मग त्यावेळी पिण्याच्या पाण्याचे (Drinking Water) काय ? पैसा असूनही लोकांना विकतचे पाणी मिळणार नाही हा प्रश्न भेडसावणार आहे. त्यात आज समाविष्ट गावांना पाणीपुरवठा (Water Supply) कसा करायचा याचा मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यातून जबाबदारी झटकण्याचे प्रकार प्रशासकीय स्तरावर सुरु झाले आहेत. हे वास्तव आहे. या पार्श्वभूमीवर आगामी 20 वर्षात पुण्याचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्या वाढणारच आहे. त्यामुळे त्यावेळी पाण्याचे नियोजन काय ? हा मोठा प्रश्न भेडसावणार आहे. त्यामुळे त्यासाठी आतापासूनच नियोजन करावे लागणार आहे. त्याकरिता मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या शासकीय जमिनींवर पीपीपी तत्वावर धरणे उभारता येणे सहजशक्य आहे. आज हे काम हाती घेतले तर आगामी 20-25 वर्षात या धरणांचे पाणी तारक ठरेल. किंबहुना 20 वर्षात ही धरणे पूर्णत्वास आलेली असतील शिवाय पाण्याबरोबरच वीजनिर्मिती ही (Power Generation) करता येईल. त्यासाठी शासनाने पीपीपी तत्वावर धरणे उभारणीला चालना दिली पाहिजे, त्यासाठी धोरण ठरविले पाहिजे.

पीपीपी तत्वावर धरणांची निर्मिती करून शंभर वर्षांचा करार करून, ते पाणी विकतही घेता येईल.
निधी उभारणी, सर्व्हे हा प्रश्नही भेडसावणार नाही. दीडशे वर्षांपूर्वी टाटाने धरण (Tata Dam) बांधले मात्र त्यातून आजमितीस किती पाणी मिळते ?
यासह मुंबईला किती पाणी मिळते आदी सर्व बाबी लक्षात घेऊन शासकीय जमिनींवर पीपीपी तत्वावर धरणे निर्मितीला चालना मिळावी.
याचा सकारात्मक विचार करून त्यानुसार कार्यवाहीबाबत आपण निर्देश द्यावेत, अशी मागणी आबा बागुल यांनी निवेदनाद्वरे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Web Title : Aba Bagul | Former Congress group leader Aba Bagul demands CM to
build dams on PPP basis to overcome future water crisis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

EPFO | पीएफ खात्यासाठी ऑनलाईन नोंदवा नॉमिनी, ईपीएफओने सांगितली पद्धत; जाणून घ्या

 

Maharashtra Weather Forecast | महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता – IMD

 

Petrol-Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात वाढ; आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?, जाणून घ्या

 

Visceral Body Fat | व्हिसरल फॅट सर्वात धोकादायक ! जाणून घ्या कोणती चरबी तुमच्या शरीरात साठवली जाते

 

Pune News | पुण्यातील आजी आता 75 वर्षानंतर जाणार पाकिस्तानातील आपल्या घरी…हृदयाच्या कोपर्‍यात नेहमी होते रावळपिंडी