‘मेरा जिस्म मेरी मर्जी’वर केलेल्या पाकिस्तानी लेखकाच्या वक्तव्यानं ‘राडा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पाकिस्तानमधील लोकप्रिय लेखक आणि डायरेक्टर खलील उर रहमान वादात सापडला आहे. त्यानं लाईव शोमध्ये पेनालिस्ट महिला पत्रकार मारवी सिरमेड (Marvi Sirmed)ला अपशब्द वापरले आहेत. लाईव्ह टेलीव्हिजन शोमध्ये मंगळवारी (दि 3 मार्च 2020 रोजी) हा प्रकार घडला. यानंतर त्याच्यावर आता टीका होताना दिसत आहे.

खलील उर रहमानला पाकिस्तानात सुरू असलेल्या औरत मार्च यावर चर्चेसाठी स्टुडिओत बोलावण्यात आलं. त्याचवेळी फोन कॉलनं पॅनलसोबत जोडल्या गेलेल्या पत्रकार मारवी सिरमेडवर खलील चांगलाच बरसला. तिच्या सोबत बोलताना त्यानं अनेक अपशब्दांचा वपार केला.

खलील औरत मार्चमध्ये मेरा जिस्म मेरी मर्जी यांसारखी घोषणाबाजी न करण्याच्या कोर्टाच्या आदेशाच्या समर्थनार्थ काही बोलत होता. त्याचं महणं होतं की, “जिस्म मेरी मर्जी यांसारख्या घोषणाबाजीवर कोर्टानं प्रतिबंध आणल्यानंतरही मी जेव्हा मारवीसारख्या लोकांच्या तोंडातून ही घोषणाबाजी ऐकतो तेव्हा माझं काळीज हादरतं.”

खलीलनं असं म्हणताच मारवीनं पुन्हा एकदा मेरा जिस्म मेरी मर्जी घोषणा दिली. हे ऐकताच खलीलच्या रागाचा पारा चढला. त्यानं लाईव्ह डिबेटमध्ये सर्व मर्यादा तोडल्या.”

खलीलनं अपशब्द वापरत म्हटलं की, “तेरा जिस्म मध्ये काय आहे. मध्ये बोलू नकोस. थुंकत नाही मुझ्या जिस्मवर. तोंड बंद ठेव.” असंच बरंच काही खलील बोलला.

यानंतर मारवीनं खलीलचा व्हिडीओ शेअर करत ट्विट केलं की, “जर एखाद्या सभ्य मीडिया इंडस्ट्रीसमोर अशा प्रकारची टिपण्णी होत असेल तर अशा लोकांवर मी बहिष्कार टाकते. परंतु हे आपलं प्रिय इस्लामिक रिपब्लिक आहे. गैरवर्तन करणाऱ्यांना कोणत्याही कारवाईला सामोरं जावं लागणार नाही. प्रत्येक मीडिया हाऊस त्यांचं असंच स्वागत करेल.”

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेक लोक खलीलवर टीका करत आहेत. एकानं कमेंट केली की, मी माझ्या आयुष्यात खलील सारखा माणूस पाहिला नाही. काही युजर्सनी टीव्ही चॅनलवरही टीका केली. काहींनी या टीआरपी फंडा असल्याचं सांगितलं.