Kharghar Heat Stroke | खारघरमधील 14 पैकी 12 जणांच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा, पोस्ट मॉर्टम अहवालामुळे खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kharghar Heat Stroke | नवी मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी राज्यभरातून अनेक श्रीसेवक आले होते. मात्र त्यांना कडक उन्हात तासन तास बसावे लागल्याने अनेकांना त्रास झाला. उष्माघातामुळे (Kharghar Heat Stroke) 14 जणांचा मृत्यू झाला. यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. याच दरम्यान मृत्यू झालेल्या 14 पैकी 12 जणांच्या पोस्ट मॉर्टम अहवालातून (Post Mortem Report) धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दुर्घटनेत मृत्यू झालेल्या 14 पैकी 12 जणांनी सहा ते सात तासांपासून काहीच खालेलं नव्हतं, असं पोस्ट मॉर्टम अहवालात स्पष्ट झालं आहे. उर्वरीत दोन जणांनी काही खाल्लं होतं की नाही ते स्पष्ट होऊ शकले नाही. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे (Kharghar Heat Stroke) 14 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये 10 महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. या प्रकरणी सात रुग्ण अद्यापही रुग्णालयात उपचार घेत आहेत.

दुसरी महत्वाची बाब म्हणजे यातील काहींना आधीपासून व्याधी (Disease) होत्या. ज्यामुळे वेळेवर न खाणं आणि प्रचंड ऊन याची भर पडली, आणि त्यांचा मृत्यू झाला. उन्हात बसलेल्या लोकांना पाण्यानंही काही फरक पडला नसता, त्यांना सावलीचीच गरज होती, असं पोस्ट मॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे पुरस्कार सोहळ्याच्या एक दिवस आधी पनवेल जिल्हा प्रशासनाचे (Panvel District Administration) अधिकारी पाहणीसाठी गेले होते. पाहणी करताना त्यांनाही उन्हाचा त्रास झाला. पण ही महत्त्वाची बाब त्यांनी वरिष्ठांना संगितली नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

तसेच एका पोलीस अधिकाऱ्याने (Police Officer) एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की,
श्रीसदस्यांना सोबत येताना जेवण, पाण्याची बॉटल आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या श्रीसदस्यांना उष्माघाताचा फटका बसला आहे.
दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेच्या दिवशी तापमान जवळपास 39 ते 41 अंश सेल्सिअस होते.
अशात शरीरातील पाणी कमी झालं. सोबतच रक्तातील प्रोटिन्सवर परिणाम झाला.

Web Title :-  Kharghar Heat Stroke | kharghar heat stroke case postmortem report 12 people empty stomach maharashtra bhushan awards

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Non-Creamy Layer Certificate | खुल्या, मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे-पिंपरी क्राईम न्यूज : पिंपरी पोलिस स्टेशन – विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या नावाने बनावट सर्टिफिकेट तयार करुन संस्थेच्या बदनामीचा प्रयत्न

Benefits of Pomegranate | ’डाळिंब’ आरोग्यासाठी ब्रम्हास्त्र, रोज करा सेवन; हृदय मधुमेह आणि सूजसंबंधी…

Pune PMC Property Tax | पुणे महानगरपालिका : अखेर मिळकत करात 40 टक्के सूट देण्याचा निर्णय ! 1 मे पासून नवीन बिलांचे वाटप, 30 जूनपर्यंत बिल भरणार्‍यांना सवलत