दहशतवादी मुल्ला ओमरचा पाक सैन्यानेच केला ‘खात्मा’, कुलभूषण जाधव यांचे केले होते अपहरण

इस्लामाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – मोस्ट वॉण्टेड दहशतवादी मुल्ला ओमर (Most Wanted Terrorist Mulla Omar) आणि त्याच्या मुलाला पाकिस्तानी सैन्याने बलूचिस्तानच्या तुर्बत भागात ठार केले आहे. मुल्ला ओमर लष्कर-ए-तैयबा, लष्कर-ए-कुरूसन आणि जैश-उल-आदल यांचा उच्च-सहाय्यक होता. मुल्ला ओमरने भारतीय नागरिक कुलभूषण जाधव ( Kulbhushan Jadhav) यांचे अपहरण करून त्यांना पाकिस्तानी लष्कराकडे सोपवले होते. मात्र पाकिस्तान सैन्याला मदत करणाऱ्या ओमरला त्यांनीच का मारले, याबाबत माहिती मिळू शकली नाही.

स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांचे अपहरण करणाऱ्या जैश अल-आदलचा दहशतवादी मुल्ला ओमर याला बलुचिस्तानच्या तुर्बत येथे त्याच्या मुलासह पाकिस्तानी सैन्याने ठार केले आहे. तो इराणमधील मोस्ट वॉन्टेड (पाकिस्तानसाठी काम करणारा) दहशतवादी होता. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तान सैन्याकडे सोपवल्यानंतर ओमर चर्चेत आला होता. मात्र पाकिस्तान सैन्याला मदत करणाऱ्या ओमरला त्यांनी का मारले, हे समजू शकले नाही. दहशतवादी मुल्ला ओमर आणि त्याच्या मुलाचा मृतदेह बलुचिस्तानमधील तुर्बात येथील स्थानिक फ्रंटियर कॉर्पसमध्ये ठेवण्यात आल आहे.

भारतीय नौदलाचे सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली एप्रिल 2017 मध्ये पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती. 10 मे 2017 रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीवर बंदी घातली. पाकिस्तानचा दावा असा होता की, जाधव यांना त्याच्या सुरक्षा दलाने 3 मार्च 2016 रोजी बलुचिस्तान प्रांतातून अटक केली होती. जिथे ते इराणमधून आले होते. नौदलातून निवृत्त झाल्यानंतर जाधव यांचे व्यवसायिक हितसंबंध असलेल्या इराणमधून अपहरण करण्यात आल्याचे भारताचे म्हणणे आहे.