एकाचवेळी एकाच परिसरातील पाच मुलं बेपत्ता !

नांदेड : (माधव मेकेवाड) पोलीसनामा ऑनलाइन – दिवसेंदिवस लहान मुलांच्या अपहरणाच्या घटना वाढतच जात आहेत, आता मात्र कहरच झाला आहे, एकाच दिवशी, एकाच परिसरातील पाच लहान मूलं बेपत्ता झाली आहेत. दरम्यान अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल ( २१ डिसेंबर ) सांयकाळी पाचच्या सुमारास नांदेड शहरातील इतवारा भागात असलेल्या मोमीन पुरा परिसरातिल पाच मुले दुपारी चार वाजता गल्लीत खेळत होते, बराच वेळ झाला तरी घरी न आल्याने त्यांचा शोध घेतला असता, ते बेपत्ता झाल्याचे कळले,  दरम्यान बेपत्ता झालेल्या मुलांच्या नातेवाईकांनी संपूर्ण परिसरात शोध शोध केली मात्र कोणाचाही शोध न लागल्याने त्यांनी इतवारा पोलिस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनीही या प्रकरणाचा शोध सुरु केला आहे.

बेपत्ता झालेल्या बालकांची नावे

शबाज शाह (वय 10)
अब्दुल मुबिन शाह (वय 9)
शेख समीर कौसर (वय 9)
मोहम्मद रेहान अब्दुल गफार (वय 10)
सय्यद जुबेर इक्बाल (वय 8)

फिर्यादी नामे महंमद शाह वय 40 वर्ष रा. मोमीनपुरा यांनी इतवारा पोलिस ठाणे येथे गु.र. नं. 358/18 कलम 363 भा.द.वी. प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान सदरील तपास सपोनी पठाण यांच्याकडे देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर सदरील बालके सापडल्यास इतवारा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही  पोलिस निरीक्षक साहेब राव नरवाडे यांनी केले आहे.