‘तानाशाह’ किम जोंग यांच्यावर शस्त्रक्रिया करताना ‘डॉक्टरां’ची झाली ‘चूक’

प्योंगयांग : वृत्तसंस्था – उत्तर कोरियाचे तानाशाह किम जोंग उन यांच्या हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेनंतर ते गंभीर आजारी असल्याचे वृत्त मागील काही दिवसांपासून येत आहे. एककिकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम आणि दक्षिण कोरोयाच्या माध्यमांनी या बातमीचे खंडन केले आहे. तर हाँगकाँगच्या एका वृत्तसंस्थेने जोंग उन यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. या सगळ्यात आता किम जोंग यांची शस्त्रक्रिया डॉक्टरमुळे अपयशी ठरली असा अहवाल समोर आला आहे.

मेट्रो यूकेनुसार किम जोंग उन यांच्या मृत्यूबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. मात्र, त्यांची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी झाली नसल्याचे समोर आले आहे. मेट्रो यूकेने केलेल्या दाव्यात किम यांच्यावर शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांच्या भीतीमुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. तर जपानच्या एका साप्ताहिकाने दिलेल्य वृत्तानुसार, शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याने किम जोंग यांची प्रकृतीला गंभीर धोका निर्माण झाला असून याला डॉक्टर जबाबदार असल्याचे साप्ताहिकाने म्हटले आहे.

शस्त्रक्रिया करताना घाबरले होते डॉक्टर
एका रिपोर्टनुसार, उत्तर कोरीयाचे सर्वोच्च नेते किंग जोंग यांच्यावर उत्तर कोरियाच्या डॉक्टरांच्या पथकाने शस्त्रक्रिया केली होती. त्याच पथकातील एक डॉक्टर शस्त्रक्रियेदरम्यान खूप घाबरला होता आणि त्याचे हात सतत थरथरत होते. शस्त्रक्रिये दरम्यान त्याने चूक केली आणि किंग जोंग यांची शस्त्रक्रिया अयशस्वी झाली. त्यानंतर उत्तर कोरियानं चीनच्या डॉक्टरांशी संपर्क साधला, आता किम जोंग यांच्य उपचारासाठी चिनमधून डॉक्टरांचे एक पथक रवाना करण्यात आले आहे.

दरम्यान, या रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की ही टीम बऱ्याच शिराने उत्तर कोरियात दाखल झाली आहे. किम जोंग यांची परिस्थिती नाजूक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किम जोंग यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये स्टेंट टाकण्यासाठी ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र डॉक्टरांच्या चुकीमुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकली नाही.

प्रकृतीबाबत सस्पेन्स कायम
यापूर्वी दक्षिण कोरियाच्या सुत्रांनी माहिती देताना सांगितले होते की त्यांची प्रकृती ठीक असून ते लवकरच लोकांसमोर येतील. मात्र, एका वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार किम जोंग यांनी काही दिवसांपूर्वी एक बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी देशाच्या मुख्य मंत्रिमंडळातही अनेक मोठे बदल केले. 2011 पासून उत्तर कोरियामध्ये किम जोंग सत्तेवर आल्यापासून त्यांनी एकही कामाचा दिवस चुकवलेला नाही. दरम्यान, अमेरिकेच्या गुप्तचर विभागाला मिळालेल्या एका छायाचित्रात उत्तर कोरियातील एक वरिष्ठ अधिकारी कुमुसनमधील पॅलेस ऑफ सन येथे किम झल सुंग यांना श्रद्धांजली वाहताना दिसत असल्याचा दावा केला आहे.