Kirit Somaiya | ‘तुम्ही पाप केले, तुम्ही घोटाळे केले तर कबुल करा’ – सोमय्यांचा अजित पवारांना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kirit Somaiya | उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या निवासस्थानी आज (गुरुवारी) आयकर विभागाने छापेमारी केली आहे. जरंडेश्वर, दौंड शुगर, आंबलिक शुगर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी कारखान्यांवर पथकाने धाडी टाकल्या आहेत. याठिकाणी कारवाई सुरू असल्याचं समजते. या कारवाईमुळे अजित पवार यांच्या अडचणी वाढणार असल्याचं बोललं जात आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चासत्र रंगल्या आहेत. यातच भाजपचे जेष्ठ नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) प्रतिक्रिया दिली आहे.

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले की, अजित पवार (Ajit Pawar) आणि माध्यमांमुळे हे आयकर विभागाची धाड सुरु असल्याचे मला कळले आहे. या धाडी कशा संदर्भात सुरु आहेत हे अजित पवारच चांगल्या प्रकारे सांगू शकतात. तुम्ही पाप केले आहे, तुम्ही घोटाळे केले आहेत तर कबुल करा. अजित पवारच नव्हे तर देशातील कुठल्याही निर्दोष व्यक्तीला तपास यंत्रणांनी हैराण करु नये, अशीच आमची भूमिका असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

 

पुढे सोमय्या म्हणाले, अजित पवारांना (Ajit Pawar) आता साखर कडू वाटायला लागली आहे. जरंडेश्वर येथे गेलो होतो. अजित पवारही काही दिवसांपूर्वी तिथे जाऊन आले आहेत. मग जरंडेश्वरचा खरा मालक कोण हे अजित पवारांनी सांगावे, अशी माझी त्या सत्तावीस हजार शेतकऱ्यांतर्फे विनंती असल्याचं किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) म्हटलं आहे.
दरम्यान, मागील अठरा महिन्यात महाराष्ट्रात लूटमार, माफियागिरी ठाकरे, पवारांनी सुरु केली आहे.
अजित पवार, शरद पवार, उद्धव ठाकरे घोटाळ्यांसंदर्भात बोलत नाहीत. साखर कारखान्यांच्या चौकशीचे आदेश हाय कोर्टाने दिलेत.
अजित पवारांमध्ये हिम्मत असेल तर मुख्य न्यायाधीशांसमोर जाऊन काय ते सांगावे, असं सोमय्या म्हणाले.

 

Web title  : Kirit Somaiya | bjp leader kirit somaiya criticised ajit pawar over it raids sugar mills

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | 10 लाखाच्या खंडणीचं प्रकरण : राजेश बजाज,
बापू शिंदे यांच्यावर आणखी एक खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल

Ajit Pawar | अजित पवारांशी संबंधीत साखर कारखान्यांवर आयकर विभागाचे छापे, उपमुख्यमंत्री म्हणाले…

Tata Group | रतन टाटा यांच्या टायटनची बाजारात ‘धूम’, TCS नंतर ‘हा’ टप्पा गाठणारी बनली दुसरी कंपनी