Kirit Somaiya | ‘रश्मी ठाकरेंना राबडी देवी म्हणणाऱ्यांना लगेच जेलमध्ये टाकलं, मग नाना पटोलेंवर कारवाई का नाही?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kirit Somaiya | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीबाबत (PM Narendra Modi) वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. ”मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो” असं वक्तव्य पटोले यांनी केलं होतं. यानंतर भाजप (BJP) आक्रमक होतं पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहे. नुकतंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारवर (Maharashtra Government) निशाणा साधला आहे. यानंतर भाजपचे जेष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना सवाल केले आहे. ”काही दिवसांपूर्वीच भाजपच्या कार्यकर्त्यांनी रश्मी ठाकरे यांना राबडी देवींची उपमा दिली म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना लगेच तुरुंगात टाकले. मग आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठे पळाले?” असा सवाल सोमय्यांनी केला.

 

माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले, ”फक्त राबडी देवीचं नाव घेतलं म्हणून तुम्ही दोघा-चौघांना जेलमध्ये टाकलंत. आता तुमच्याच मित्रपक्षाच्या अध्यक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याची भाषा केली आहे. मग आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठे पळाले? नाना पटोले यांच्यावर काय कारवाई करणार, याचं उत्तर त्यांनी द्यावे,” अशी मागणी त्यांनी केली.

 

दरम्यान, नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप नेते प्रचंड आक्रमक झाले आहेत.
राज्यात ठिकठिकाणी नाना पटोले यांच्याविरोधात भाजपकडून निदर्शने सुरु आहेत.
पटोले यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपने केली आहे.
यानंतर पटोले यांच्या मुंबई आणि भंडाऱ्यातील घराबाहेरील पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

वादाच्या पार्श्वभूमीवर पटोले काय म्हणाले?
”मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी काहीही बोललो नाही. मी ज्या मोदींचा उल्लेख केला तो गावगुंड आहे.
मात्र, भाजप मोदी नावावरुन विनाकारण रान उठवून पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवत आहे.
आता काँग्रेसच भाजपविरोधात तक्रार दाखल करेल,” असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Kirit Somaiya | bjp leader kirit somaiya reaction on nana patole statement about pm narendra modi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Vishal Phate Scam | ‘बिगबुल’च्या टी-शर्टमध्ये विशाल फटे शरण, 81 जणांनी केल्या तक्रारी

 

Omicron Variant Alert | ‘या’ कारणामुळे वेगाने पसरतोय ओमिक्रॉन व्हेरिएंट, अशाप्रकारे करा बचाव; जाणून घ्या

 

Pune Crime | पुण्यात गुन्हेगारांचा पुन्हा ‘राडा’ ! हातात धारदार हत्यारे घेऊन घातला नंगानाच