Kirit Somaiya | ‘अनिल परब यांची आमदारकी आणि मंत्रीपद रद्द करण्यासाठी राज्यपाल आणि निवडणूक आयोगाकडे जाणार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kirit Somaiya | राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांत आरोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच भाजपचे (BJP) जेष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे आघाडी सरकारमधील मंत्री, नेत्यावर सतत आरोप करत असल्याचे पाहायला मिळते. सोमय्या यांनी आता शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सीआरझेडमध्ये (CRZ) बेकायदेशीर रिसॉर्ट बांधल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. तसेच अनिल परब यांची आमदारकी आणि मंत्रीपद रद्द करण्यासाठी आणि मंत्रीपद काढून घेण्यासाठी राज्यपाल (Governor) आणि निवडणूक आयोगाकडे (Election Commission) जाणार असल्याचा इशारा किरीट सोमय्यांनी दिला आहे.

 

यावेळी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अनिल परब यांना वाचवण्यासाठी खूप खोटेनाटे प्रयत्न केले आहे. शेवटी पर्यावरण मंत्रालयाने परब यांचा रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याची नोटीस पाठवली आहे. 17 डिसेंबरच्या या नोटीसला 3 जानेवारीपर्यंत उत्तर द्यायचं आहे. मला विश्वास आहे की 5 ते 7 जानेवारीला महाराष्ट्र सरकारकडे अनिल परब यांचा रिसॉर्ट तोडण्याचे आदेश येतील. असं सोमय्या म्हणाले.

पुढे ते म्हणाले, ‘फक्त अनिल परब (Anil Parab) यांचा रिसॉर्ट तुटेल असं नाही.
त्यापुढे जाऊन आम्ही आणखी विभागांमध्ये तक्रारी केल्या आहेत. हे पैसे कुठून आले? स्वतःच्या नावावर मंत्री म्हणून थ्री फेज कनेक्शन घेतलं.
बेकायदेशीर बांधकाम केलं. मंत्री, आमदार सीआरझेडमध्ये बेकायदेशीर बांधकाम करतो.
त्यामुळे त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं अशीही आमची पुढील याचिका असेल,’ असं सोमय्यांनी (Kirit Somaiya) म्हटलं आहे.

 

दरम्यान, ‘तोडकामाचे आदेश आले की महाराष्ट्र सरकार किती लांबवतं हे पाहू. परंतु,
तोडकामाचे आदेश आल्यानंतर जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात आम्ही त्यांची आमदारकी रद्द करण्यासाठी
आणि मंत्रीपद काढून घेण्यासाठी राज्यपाल आणि निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत.’ असं देखील किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Kirit Somaiya | bjp leader kirit somaiya warn minister anil parab over his alleged illegal resort demolition

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | बेकायदेशीर खासगी सावकारी करणाऱ्या आशिष पाटणे याच्यावर गुन्हे शाखा युनिट 5 कडून कारवाई

बिहारमध्ये उंदरांचा नवीन ’कारनामा’, दारू आणि धरणानंतर आता X-Ray मशीनला केले टार्गेट, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 51 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी