Kirit Somaiya in PMC | किरीट सोमय्या यांच्या ‘पायर्‍यांवरील’ सत्कारावेळी महापालिका भवनला पोलिस छावणीचे स्वरुप; सर्वसामान्य नागरिकांना व कर्मचार्‍यांनाही महापालिकेत प्रवेश बंदी केल्याने दिवसभर काम ठप्प (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Kirit Somaiya in PMC | शिवसैनिकांनी (Shivsainik) किरीट सोमय्या यांना महापालिका भवनच्या (Pune Mahapalika Bhavan) पायर्‍यांवर केलेल्या धक्काबुक्कीला प्रत्युत्तर म्हणून आज शहर भाजपने (BJP) त्याच पायर्‍यांवर सोमय्या यांचा सत्कार करण्याच्या कार्यक्रमामुळे महापालिकेमध्ये (Pune Corporation) चांगलाच राडा झाला. सकाळपासूनच पोलिसांनी महापालिकेला छावणीचे स्वरूप दिल्याने सर्वसामान्य नागरिकच काय पण अधिकारी आणि कर्मचार्‍यांनाही महापालिकेत प्रवेश करता आला नाही. साडेचार वाजण्याच्या सुमारास महापालिकेत आलेल्या सोमय्या यांना भाजप कार्यकर्त्यांच्या गर्दीतून आत नेताना चांगलीच ओढाताण झाली. महापालिका भवनच नव्हे तर शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी रस्ताही काही तास बंद करण्यात आल्याने वाहतुकीचा फज्जा उडाल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला. (Kirit Somaiya in PMC)

 

 

कोरोना काळात पीएमआरडीएने (PMRDA) उभारलेल्या जंबो हॉस्पीटलच्या (PMC Jumbo Hospital) कामात भ्रष्टाचार (Corruption) झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. यामागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते संजय राउत (Sanjay Raut) हेच सूत्रधार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यासंदर्भात तक्रार देण्यासाठी मागील शनिवारी महापलिकेत आलेल्या सोमय्या यांना शिवसैनिकांसोबत झालेल्या गोंधळात सोमय्या पायर्‍यांवर पडले व त्यांना दुखापत झाली. विशेष असे की ही घटना घडली तेंव्हा भाजपचा पालिकेतील अथवा पक्षाचा एकही पदाधिकारी नव्हता. या घटनेची गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या भाजप नेत्यांनी दखल घेतली. भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी आज पुणे दौर्‍यावर आलेल्या सोमय्या यांचा ते ज्या पायरीवर पडले त्याच पायरीवर सत्काराचे आयोजन केले होते. (Kirit Somaiya in PMC)

 

पुन्हा कुठल्याही प्रकारचा गोंधळ होउ नये म्हणून पोलिसांनी आणि महापालिका प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांनी संपुर्ण महापालिका भवनचा अक्षरश: ताबा घेतल्याने छावणीचे स्वरूप आले होते. पुढील दोन दिवस सुट्टी असल्याने कामे करून घेण्यासाठी आलेल्या शहराच्या सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांनी महापालिका भवनमध्ये प्रवेशच दिला नाही. महापालिकेच्या तिनही प्रवेशद्वारांवर ओळखपत्र पाहूनच अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रवेश देण्यात आला.

 

दुपारी साडेतीन वाजता सोमय्या महापालिकेमध्ये येणार असल्याने दुपारी दोन वाजल्यानंतर अगदी बाहेर असलेल्या महापालिकेचे अधिकारी व कर्मचार्‍यांनाही प्रवेश दिला गेला नाही. साडेचारच्या सुमारास पोलिस बंदोबस्तात सोमय्या यांचा ताफा पालिकेत आला. परंतू मिनिटभर थांबून तो ताफा तसाच बाहेर पडला. महापालिका भवन बाहेर व लगतच असलेल्या भाजप कार्यालयाबाहेर भाजपचे कार्यकर्ते मोठ्याप्रमाणावर जमले होते. त्यामुळे टिळक पुलावरून महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे येणारा मार्ग तसेच शिवाजी रस्ता बॅरीकेड लावून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.

 

काही वेळातच सोमय्या, शहर प्रमुख जगदीश मुळीक यांच्यासह शेकडो महिला, युवा कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत मुख्य प्रवेशद्वारावर थकडले. पोलिस आणि सुरक्षा रक्षकांनी एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना प्रवेश नाकारल्यानंतर जोषात असलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करतच प्रवेशद्वार ढकलत सोमय्या यांच्या सुरक्षा पथकासह आतमध्ये प्रवेश केला. कार्यकर्ते इतके बेभान झाले होते की सोमय्या यांना गर्दीतून वाचविण्यासाठी त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी अक्षरश: त्यांना बकोटीला पकडूनच आतमध्ये नेले. महापालिकेच्या पायर्‍यांवर पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांने ‘ एकच भाई, किरीट भाई’ अशी जोरदार घोषणाबाजी करत शिवसेनेच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol), खासदार गिरीष बापट (MP Girish Bapat), स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasne), सभागृह नेते गणेश बिडकर (Ganesh Bidkar) यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोमय्या आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेउन आल्यानंतर त्यांनी उपस्थितांसमोर थोडक्यात मार्गदर्शन केले. शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सोमय्या यांचा पुष्पगुच्छ व शाल देउन सत्कार केला.

कोरोना काळात उभारण्यात आलेल्या जंबो कोव्हिड हॉस्पीटलच्या कामांत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे.
राज्य शासनाने हे काम त्यांच्या निकटवर्तीयांना दिले होते. या भ्रष्टाचारामागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते संजय राउत आहेत.
मागील आठवड्यात माझ्यावर शिवसेनेच्या गुंडांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला. परंतू गुन्ह्याच्या तुलनेत कमी कलमे लावली.
पोलिस राज्य सरकारच्या दबावाखाली काम करत आहे. त्यामुळे तक्रार देण्यासाठी मी पुण्यात आलो आहे.
महाविकास आघाडी सरकारने माझ्यावर कितीही हल्ले केले तरी मी सत्य उजेडात आणणार.

 

– किरीट सोमय्या, भाजप नेते.

 

Web Title :- Kirit Somaiya in PMC | Pune Mahapalika Bhavan Pune Police BJP Kirit Somaiya Pune Corporation PMC

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Aurangabad News | काय सागंताय ! होय, चक्क भंगार विक्रेत्याचा सरकारला 200 कोटींचा गंडा

 

Coronavirus in Maharashtra | गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 5,455 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Tejasswi Prakash | बिग बॉसच्या घरात शारिरीक संबंध न ठेवताच अभिनेत्री प्रेग्नेंट; जाणून घ्या प्रकरण