Kirit Somaiya | ‘… तो पर्यंत संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड जेलमध्ये राहणार’, किरीट सोमय्यांचे मोठं भाकीत (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पत्राचाळ घोटाळा प्रकरणात (Patra Chawl Land Scam Case) ईडी कोठडीत (ED Custody) असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांना आज (सोमवार) पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. सेशन कोर्टाने (Session Court) राऊतांना 22 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली आहे. त्यामुळे त्यांचा पुढील मुक्काम हा मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात (Arthur Road Jail Mumbai) असणार आहे. याच ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते (NCP) नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे देखील आहेत. यावरुन भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मोठा दावा केला आहे. आता संजय राऊत यांचा मुक्काम नवाब मलिक यांचे शेजारी बनून आर्थर रोड जेलमध्ये असणार आहे, असे मोठं भाकित किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलं आहे.

 

 

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले, आता संजय राऊतांचा मुक्काम नवाब मलिक यांचे शेजारी बनून आर्थर रोड जेलमध्ये राहणार. सध्या तर पत्राचाळ घोटाळ्याची चौकशी सुरु आहे. वसई 2000 कोटींचा पर्ल ग्रुप घोटाळा (Pearl Group Scam), दुबईमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बिल्डर्स मंडळींसोबत बैठका, चीन दौरा… घोटाळ्यांची चौकशी होईपर्यंत संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड जेलमध्ये राहणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात राऊतांना न्यायालयाने यापूर्वी ईडीची कोठडी सुनावली होती.
ती आज संपली. यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले.
ईडीने त्यांची कोठडी मागितली नाही. त्यामुळे कोर्टाने संजय राऊतांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

 

Web Title :- Kirit Somaiya | now sanjay rauts stay will be nawab maliks neighbor in arthur road jail

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा