‘किसान मानधन’ योजना 12 सप्टेंबरला ‘लॉन्च’ ! 5 कोटी शेतकर्‍यांना फायदा, पेंशनसाठी करा नोंदणी, जाणून घ्या ‘ही’ प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयुष्मान भारत नंतर मोदी सरकारची महत्वकांक्षी योजना समजली जाणारी किसान मानधन योजनेची सुरुवात झारखंड मधून होणार आहे. याचा शुभारंभ पंतप्रधान 12 सप्टेंबरपासून करेल. केंद्र सरकारच्या संयुक्त सचिव विवेक अग्रवाल यांनी समीक्षा बैठकीत याची माहिती दिली. ते म्हणाले की शेतकऱ्यांची नोंदणी कॉमन सर्विस सेंटरवर करण्यात येत आहे.

काय आहे पंतप्रधान किसान मानधन योजना
या योजनेअंतर्गत 5 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळेल, ज्येष्ठ नागरिक झाल्यानंतर म्हणजेच 60 वर्ष वयानंतर दरमहा तुम्हाला 3000 रुपये पेंशन मिळेल. या योजनेसाठी पात्र असलेल्यांचे वय 18 ते 40 वर्ष असणे आवश्यक आहे. वयानुसार प्रीमियम कमी जास्त होईल. याचा कमीत कमी असलेल्या प्रीमियम 55 रुपये तर जास्तीत जास्त प्रीमीयम 200 रुपये असेल. जेवढी रक्कम तुम्ही जमा करणार तेवढीच रक्कम सरकार जमा करणार आहे.

लॉन्च करण्याआधी 1 लाख शेतकऱ्यांना जोडण्याचे लक्ष्य
अग्रवाल यांनी सांगितले की, राज्यात 10 हजार कॉमन सर्विस सेंटर कार्यानवित आहेत. प्रत्येक केंद्रच्या माध्यमातून प्रतिदिवशी 50 शेतकऱ्यांना जोडण्याचे लक्ष्य आहे. हे कार्य वेगाने केले जात आहे. यातून 1 लाख शेतकऱ्यांना जोडण्याचे लक्ष्य आहे.

संयुक्त सचिवांनी सांगितले की, विविध स्तरावर शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहे. शेतकऱ्यांचे आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती घेऊन स्थानिक कर्मचाऱ्यांच्या सहयोगाने शेतकऱ्यांचे अर्ज भरुन कॉमन सर्विस सेंटरमध्ये नोंदणी करण्यात येत आहे.

तसेच जिल्ह्यातील या योजनेबाबत महिती देण्यात येईल. ज्याद्वारे त्यांना या योजनेला जोडता येईल. आयुष्यमान भारत अंतर्गत लाभार्थ्यांचे कार्ड तयार करण्यात आले आहे. त्याच प्रकारे शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांचा दर्शवून त्यांचे नोंदणी मानधन योजनेअंतर्गत करण्यात येईल. त्यासाठी निर्देश देखील काढण्यात येतील.

याच प्रक्रियेअंतर्गत पंचायत स्तरावर कँप लावून जास्तात जास्त शेतकऱ्यांना योजनेला जोडण्याचे निर्देश देण्यात आला आहे.

राज्यातील सात शेतकऱ्यांना पीएम देणार प्रमाणपत्र
अग्रवाल म्हणाले की, राज्य सरकार कॉमन सर्विस सेंटरमधून पासवर्ड घेऊन आपल्या एजेंसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या नोंदणीकरण या योजनेअंतर्गत करण्यात येत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत जोडले जाईल. राज्यातील सात शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदी प्रमाणपत्र देतील.

योजनेच्या नोंदणीसाठी ही कागदपत्र आवश्यक
1.
आधार कार्ड
2. जमिनीची कागदपत्रे
3. बँक पासबूक
4. रेशन कार्ड
5. 2 फोटो

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ही कागदपत्र घेऊन तुम्हाला कॉमन सर्विस सेंटरमध्ये जावे लागेल. तेथे शेतकऱ्यांची या योजनेसाठी नोंदणी करण्यात येईल.