Pune Crime | शारीरीक संबंधाचे चित्रण करुन ते पहिल्या पतीला पाठवून केली बदनामी; वानवडी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लग्नाचे अमिष (Lure Of Marriage) दाखवून शारीरीक संबंध (Physical Relation) ठेवून त्याचे चित्रण करुन ते पहिल्या पतीला पाठवून महिलेची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police) दीपक मच्छिंद्र रणदिवे Deepak Machhindra Ranadive (वय ३४, रा. मार्गोसा सोसायटी, महंमदवाडी, वानवडी) याला अटक केली आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी एका वानवडीतील २६ वर्षाच्या महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwandi Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पहिले लग्न झाले होते. गेल्या काही वर्षांपासून फिर्यादी यांचे दीपक रणदिवे याच्याशी संबंध होते.

 

दीपक याने त्यांना लग्नाचे आमिष दाखवून १५ एप्रिल २०१९ रोजी वडकी नाला येथील हॉटेलमध्ये नेले.
तेथे त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्याबरोबर शारीरीक संबंध प्रस्थापित केले.
त्यानंतर वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना घेऊन जाऊन त्यांच्याबरोबर शारीरीक संबंध ठेवले (Pune Crime).
यादरम्यानच्या काळात फिर्यादी यांच्या नकळत त्याने फिर्यादी यांचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो व व्हिडिओ काढले होते.
फिर्यादी यांनी लग्नाविषयी विचारले असता त्याने लग्नास नकार दिला. तसेच नकळत काढलेले फोटो व व्हिडिओ त्याने फिर्यादी यांच्या पहिल्या पतीला पाठवून त्यांची बदनामी केली. ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांनी घाबरुन पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | physical relationship video sending it to the first husband Crime in the Wanwadi area

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा