चुलत बहिणीवर चाकूने वार करुन पळणाऱ्यास पकडले ; पकडणाऱ्यावर रोखली पिस्तुल, महर्षीनगरमधील घटना

पुणे : पोलिसनाम ऑनलाईन –  जमिनीच्या वादातून सख्या चुलत बहिणीवर चाकूने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वार करुन पळून जाणाऱ्या भावाला नागरिकांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने नागरिकांवर पिस्तुल रोखले. मात्र आलम शेख याने जीवाची पर्वा न करता त्याच्या हातातून पिस्तुल हिसकावून घेऊन त्याला पकडले. विनोद मधुकर सराफ (वय ४४, रा गुजराथ कॉलनी, कोथरुड) असे चाकुने वार करुन पळणाऱ्याचे नाव आहे. स्वारगेट पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणी महर्षीनगरमध्ये राहणाऱ्या त्याच्या चुलत बहिणीने फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, सराफ हे मुळचे जळगाव जिल्ह्यातील यावल येथील राहणारे आहेत. सुमारे १५ वर्षांपूर्वी सराफ याच्या वडिलांनी गावाकडील जमिनी विकली होती. त्या विक्रीला सराफ याच्या चुलत्यांनी आक्षेप घेतला असून सध्या हे प्रकरण प्रलंबित आहे. विनोद सराफ हा एलएलबी झाला
असून कोथरुडमध्ये त्याच्या वडिलांनी बांधलेल्या इमारतीत त्याने होस्टेल केले आहे. तेथेच पत्नी व मुलीबरोबर तो राहतो. जमिनीचा वाद संपत नसल्याने तो दारु पिऊन आपल्या चुलत भावाला मारण्यासाठी चाकू व जुने पिस्तुल घेऊन आला होता. पण भावा ऐवजी बहिणच समोर आल्याने त्याने तिच्यावर चाकूने वार केले. बहिणीचा आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्याच्याकडील पिस्तुल काढून नागरिकांवर रोखले. तेथेच असलेल्या आलम शेख याने त्याला पकडले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले त्यांनी सराफ याला ताब्यात घेतले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नायकवडी यांनी पोलीसनामाच्या प्रतिनिधीला सांगितले की, सराफ हा चुलत भावाला मारण्यासाठी आला होता. बहिण समोर आल्याने तिच्यावर त्याने वार केले.

या घटनेची माहिती मिळल्यावर सराफ याचा चुलत भाऊ तेथे आला तेव्हा त्याने पोलिसांसमोर तुम्हा सगळ्यांना संपविणार, सोडणान नाही, अशी धमकी दिली.

आरोग्यविषयक वृत्त –