कोंढवा पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या ‘भाटी’ला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  खोटी तक्रार देऊन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या फिर्यादी प्रकाश भाटी याला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे .

पोलीस असल्याची बतावणी करुन खंडणी उकळल्याची फिर्याद देण्यापूर्वी प्रकाश भाटी याने आपल्या गोदामातील तंबाखुजन्य पदार्थ दुसरीकडे हलविल्याचे तपासात समोर आले पोलिसांनी त्याच्या ताब्यातून ६ लाख ४१ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे .

तसेच पोलिसांना भाटी यांनी खोटी माहिती दिल्याचे प्रथमदर्शी दिसून येत आहे. त्यानुसार त्यांच्यावर देखील कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितले.