‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो चक्क दिवाळीचा फराळ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री किशोरी गोडबोलेला आपण सर्वजण ओळखतो. तुम्हाला माहिती आहे का किशोरी गोडबोलेचे पती दिवाळीचे फराळ विकतात. विशेष बाब अशी की, दिवाळीच्या फरळाची त्यांच्याकडे कोट्यावधींची उलाढाल होते. गोडबोलेंच्या या फराळाला अगदी परदेशातून मागणी असून परेदशातून येणारी मागणी खूप वाढलीदेखील आहे. बॉलिवूडची अदाकारा माधुरी दीक्षित जेव्हा डॉ. नेनेंशी लग्न करून अमेरिकेत स्थायिक झाली तेव्हा तिच्या घरी हेच फराळ पोहोचायचं.

किशोरी गोडबोले यांच्या पतीचं नाव आहे सचिन गोडबोले. सचिन यांची आई सुमती गोडबोले यांनी अगदी 5 पदार्थ विकून व्यवसाय उभा केला होता. आता त्यांचे दादरला खास मराठी घरगुती खाद्य पदार्थांचे म्हणजेच फाराळाचे अद्ययावत दुकान आहे. आधी हा त्यांचा हा व्यवसाय सचिन पाहत नसत.

कारण सचिन जपानमधील एका मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होते. परंतु त्यांच्या वडिलांचे अचानक निधन झाले तेव्हा त्यांच्या आईने त्यांना नोकरी सोडून व्यवसाय सांभाळण्यासाठी सांगितले. त्यांनीही आईच्या शब्दाचा मान ठेवत आपली चांगल्या पदाची नोकरी सोडली आणि व्यवसाय सांभाळण्यास सुरुवात केली.

मराठीतील प्रसिद्ध गायक जयवंत कुलकर्णी यांची कन्या किशोरीसोबत सचिन यांनी विवाह केला. सचिन आणि किशोरी यांना गौरी आणि सई अशा दोन मुली आहेत. किशोरी गोडबोलेने अनेक मराठी आणि हिंदी मालिकेत काम केले आहे. मिसेस तेंडुलकर, माधुरी मिडल क्लास, अधुरी एक कहाणी, हद कर दी, एक दो तीन, खिडकी अशा अनेक तिच्या मालिका सांगता येतील. किशोरीने हिंदी मालिकेत आपला चांगलाच जम बसवला आहे.

किशोरीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सध्या ती मेरे साई ही मालिका करत आहे. यात तिची प्रमुख भूमिका आहे. फुल 3 धमाल, खबरदार, कोहराम, वन रूम किचन असे तिचे काही सिनेमे सांगता येतील.

Visit : Policenama.com