तुमचं PAN कार्ड नेमकं काय सांगतं ?, त्यावरील 10 अंकाचा अर्थ काय ?, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पर्मनंट अकाउंट नंबर म्हणजेच पॅन कार्ड हे कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करण्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर आयकर भरण्यासाठी देखील तुम्हाला पॅनकार्ड लागतेच. तसेच बँकेत खाते उघडताना देखील पॅन क्रमांक अवश्य विचारतातच. त्यामुळे या पॅनकार्डवर असणारी माहिती नेमकी काय आहे, याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. या कार्डवर असणाऱ्या 10 क्रमांकांबद्दल देखील आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.
मात्र या कार्डवर असणारे हे 10 अल्फान्यूमरिक क्रमांक कशाप्रकारे बनतात तसेच त्याचा नक्की अर्थ काय असतो याची तुम्हाला माहिती आहे का ? त्यामुळे आज आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती सांगणार आहोत. हा क्रमांक आयकर विभाग यूटीआय किंवा एनएसडीएल यांच्याकडून जारी करण्यात येतो. तसेच या कार्डवरील प्रत्येक अक्षरमागे काहीतरी माहिती लपलेली असते. पॅनकार्डवर 10 आकडी क्रमांक असतो. यामध्ये सुरुवातीचे 5 अल्फा बेट असतात तर 4 क्रमांक असतात आणि सर्वात शेवटी पुन्हा एका अल्फाबेट असतो. सुरुवातीच्या 5 अल्फाबेटमधील 3 अक्षरे हि AAA पासून ZZZ पर्यंत असतात. तसेच चौथे अक्षर हे आयकर विभागाच्या नजरेत तुम्ही काय आहात हे दर्शवते. तसेच तुम्ही वैयक्तिक करधारक असल्यास आयकर विभाग चौथ्या क्रमांकावर तुमच्या कार्डवर P या अक्षराचा वापर करते.
याप्रमाणे दिली जातात अल्फाबेट
1) अविभाजित हिंदू परिवारासाठी H या अक्षराचा वापर केला जातो.
2) व्यक्तींच्या संघासाठी A या अक्षराचा वापर केला जातो.
3) बॉडी ऑफ इंडिविजुअल्स साठी B या अक्षराचा वापर केला जातो.
4) सरकारी एजन्सीसाठी G या अक्षराचा वापर केला जातो.
5) आर्टिफिशियल ज्युडिशियल व्यक्तीसाठी J या अक्षराचा वापर केला जातो.
6) लोकल अथॉरिटी साठी L या अक्षराचा वापर केला जातो.
7) ट्रस्टसाठी T या अक्षराचा वापर केला जातो.
पाचवा अल्फाबेट हा तुमच्या आडनावाचे अक्षर दर्शवितो. पुढील चार क्रमांक हे नेहमी ओळीने येतात. 0001 पासून 9999 पर्यंत कोणताही क्रमांक तुम्हाला दिला जाऊ शकतो. या पद्धतीने तुम्ही पॅनकार्डवरील सर्व माहिती समजून घेऊ शकता. तसेच O अक्षर आणि ० मधील फरक तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही कार्डच्या मागील माहिती वाचून तुमची शंका दूर करू शकता.
Visit : Policenama.com
तुमच्या मुलांच्या डोळ्यांची अशी घ्या काळजी, उपाय जाणून घ्या
जाणून घ्या ‘सेक्शुअल लाइफ’ असंतुष्ट असण्याची कारणे, अशी घ्या काळजी
चिंच आहे बहुगुणी, उन्हाचा कडाका वाढला तर आवश्य खा
शरीरात ‘या’ ठिकाणी लपतो ‘एड्स’चा व्हायरस, संशोधकांनी केला दावा
मधुमेहाचे औषध स्तनाच्या कॅन्सरवर उपयुक्त, चिनी संशोधकांचे मत
मुलांना कोणत्या वयात शाळेत घालावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
ऑफिसमध्ये जेवण करताना घ्यावी ‘ही’ काळजी, तुमच्यासाठी ठरु शकते फायदेशीर
नाभीवर लावा २ थेंब दारु, दूर होतील पीरियड्ससंबंधीत ‘या’ समस्या, जाणून घ्या