‘त्वचा’ आणि ‘केसां’साठी अत्यंत फायदेशीर कोरफड बटर, जाणून घ्या बनवण्याचा योग्य मार्ग

पोलीसनामा ऑनलाईन : कोरफड हे त्वचा आणि केसांची निगा राखण्यासाठी खूप चांगले मानले जाते. त्याच्या पानांतून बाहेर पडणारे जेल आरोग्यासोबतच केसांसाठी खूप आरोग्यदायी असतात. कोरफड जेल चेहऱ्यावरील मुरुम असो वा जळजळ होण्याची समस्या यासारख्या अनेक समस्यांसाठी मदत करते. कोरफड आपल्या त्वचेला हायड्रेट ठेवण्यास, त्वचेवरील सुरकुत्या, मुरुमांपासून मुक्त त्वचा आणि लालसरपणा दूर करण्यास मदत करू शकते. या गुणधर्मांमुळे कोरफड जेलचा वापर अनेक घरगुती फेस मास्क तयार करण्यासाठी केला जातो. पण आपण कधी कोरफड बटर संदर्भात ऐकले आहे का ? याबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल किंवा त्याबद्दल ऐकले असेल. जाणून घेऊया घरीच कोरफड बटर बनविण्याची प्रक्रिया..

काय आहे कोरफड बटर ?
एलोवेरा जेल, जेव्हा शिया बटरसह वापरला जातो, तेव्हा त्याला कोरफड बटर म्हणतात. आपल्या त्वचेची देखभाल नियमित करण्यासाठी हे खूप चांगले मानले जाते. हे आपली त्वचा आणि केसांची निगा राखण्यासाठी आपल्याला मदत करते. ते आपण हेअर मास्क, फेस मास्क आणि लोशन म्हणून वापरु शकतो.

कोरफड बटर कसे बनवायचे?
साहित्य
1 चमचे शिया बटर
3 चमचे एलोवेरा जेल

एक मोठी वाटी घ्या. एक चमचा शिया बटर आणि 3 चमचे एलोवेरा जेल घाला.
या दोन्ही घटकांना चांगले मिक्स करा. जोपर्यंत पेस्ट फ्लपी आणि मऊ होत नाही तोपर्यंत चांगली हलवा.
यानंतर ते एका भांड्यात भरा. कमीतकमी दोन आठवड्यांसाठी ते थंड आणि कोरड्या जागी ठेवा.

कोरफड बटर कसे वापरावे
केसांवर कोरफड बटर लावण्यासाठी प्रथम केस धुवा. हे आपल्या केसांच्या स्काल्पवर चांगले लावा. आता सुमारे 15 ते 20 मिनिटांनंतर थंड पाण्याने आपले केस धुवा.

त्वचेसाठी कोरफड बटर
कोरफड बटर वापरल्याने त्वचा खूप मऊ होते. आपण मॉइश्चरायझर म्हणून देखील हे वापरू शकता. चेहऱ्याव्यतिरिक्त हे जेल ओठांवर देखील वापरले जाऊ शकते. या व्यतिरिक्त, आपण या पॅकचा वापर डार्क सर्कल्‍स आणि चेहऱ्यावरील डाग आणि बारीक रेषा बरे करण्यासाठी देखील करू शकता. ते आपल्या चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटे तसेच ठेवा, त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.