जाणून घ्या कशामुळं येतो ‘घाम’ आणि त्याचा आजारांशी काय आहे ‘संबंध’

पोलिसनामा ऑनलाइन – जेव्हा शरीर एखाद्या कारणामुळे सामान्य तापमानाच्या तुलनेत गरम होते, तेव्हा आपला मेंदू ते सामान्य तापमानात आणण्यासाठी जे करतो त्यामुळे आपल्याला घाम येतो. शरीरात हे तापमान जास्त व्यायाम, जास्त काम किंवा बाहेरच्या तापमानामुळे वाढते. अशा स्थितीत आपला मेंदू प्रतिक्रिया करतो आणि लाखो एक्रीन ग्रंथींद्वारे संपूर्ण शरीरात पाणी सूटते, ज्यामुळे शरीराचे तापमान कमी किंवा सामान्य व्हावे.

काही अवयवात घामाच्या वेगळ्या ग्रंथी
परंतु काही वेळा घाम काही खास अवयवांना जास्त येतो, जसे की काख इत्यादी. येथे एपोग्रीन ग्रंथी घाम निर्माण करतात आणि येथे ती बॅक्टेरिया सुद्धा बनवते, ज्यामुळे घामातून अंतरक्रिया केल्याने घामाला दुर्गंधी येते.

नेहमीच घामाला दुर्गंधी येत नाही
एक्रीन ग्रंथीप्रमाणे एपोग्रीन ग्रंथीसुद्धा व्यायामाच्या दरम्यान सक्रिय असते. परंतु, एपोक्रीन ग्रंथी तेव्हाच सक्रिय होते, जेव्हा आपण भाविनक, अस्वस्थ किंवा उत्तेजित मानसिक स्थितीत येतो. याचा अर्थ हा आहे की, शारीरिक मेहनतीने येणार्‍या घामाला दुर्गंधी इतकी येत नाही, जेवढी बेचैनी किंवा उत्तेजनेमुळे येणार्‍या घामाने येते.

आजाराशी घामाचा संबंध
अनेकदा घामाचा संबंध आजाराशी सुद्धा असतो. हृदयाची समस्या झाल्यास घाम खुप येतो, परंतु याची दुसरी कारणे सुद्धा असू शकतात. असामान्य घाम येणे एकप्रकारचा संकेत असू शकतो की, आता तुम्ही डॉक्टरांना दाखवण्याची गरज आहे. यासोबतच अन्य लक्षणे सुद्धा डॉक्टरांना योग्य समस्या समजण्यास मदत करू शकतात.

विविध लोकांना वेगवेगळ्या प्रकारचा घाम येतो का
हे अनेक कारकांवर अवलंबू आहे. परंतु, हे सत्य आहे की, विविध लोकांना वेगवेगळ्या प्रमाणात घाम येतो. जसे की, जास्त वजन असलेल्या आणि लठ्ठ लोकांना जास्त घाम येतो. याशिवाय वय, शरीरातील मांसपेशींची मात्रा, आरोग्यसंबंधी कारणे आणि फिटनेस स्तरासारखी अनेक कारणे आहेत, ज्यांच्यामुळे घाम येण्याचे प्रमाण वेगवेगळे असू शकते.

मात्र, घाम येणे चांगली गोष्ट आहे आणि घामामुळे जी दुर्गंध येते त्याचे कारण घाम नसून अंतर्गत क्रिया करणारे बॅक्टेरिया असतात आणि ही दुर्गंधी आर्मपिट सारख्या ठिकणी विशेष करून निर्माण होते.