KNOW YOUR POSTMAN | डाक विभागाने लाँच केले ’नो युअर पोस्टमन’ अ‍ॅप, एका क्लिकने मोबाइलवर येईल पोस्टमनची सर्व माहिती

मुंबई : KNOW YOUR POSTMAN | मुंबई पोस्ट विभागाने लोकांच्या सोयीसाठी शनिवारी ’नो युअर पोस्टमन’ अ‍ॅप (KNOW YOUR POSTMAN) लाँच केले. याद्वारे तुम्ही घरबसल्या आपल्या परिसराच्या बीट पोस्टमनची सर्व माहिती मिळवू शकता. राष्ट्रीय मेल दिवसानिमित्त लाँच करण्यात आलेले हे अ‍ॅप्लीकेशन डाक विभागाने एक क्रांती असल्याचे म्हटले आहे (Mumbai Post Department launched the ‘Know Your Postman’ app).

पत्रकार परिषदेत पोस्टमास्टर जनरल स्वाती पांडेय (Postmaster General Swati Pandey) यांनी सांगितले की, मुंबईत डाक विभागाच्या इतिहासात हे पहिले अ‍ॅप्लीकेशन आहे, ज्याद्वारे लोक बीट पोस्टमनची सर्व माहिती सहज प्राप्त करू शकतात. हे अ‍ॅप्लीकेशन मुंबई पोस्टल विभागाद्वारे बनवण्यात आले आहे आणि 16 ऑक्टोबरपासून ते गुगल प्लेस्टोअरवर  उपलब्ध आहे.

86 हजार ठिकाणांचा डाटाबेस

स्वाती पांडेय यांनी सांगितले की, मुंबई एक मोठे क्षेत्र आहे.
यासाठी अ‍ॅप्लीकेशनमध्ये 86 हजार ठिकाणांचा डाटाबेस आहे.
लोक ठिकाण, पिनकोड किंवा पोस्ट ऑफिसचे नाव टाकून बीट पोस्टमनची माहिती मिळवू शकतात.

अ‍ॅप्लीकेशनवर तुम्हाला ज्या पोस्टमनची माहिती मिळवायची आहे, त्याचे नाव, मोबाइल नंबर, फोटो आणि पोस्ट ऑफिसचे नाव तुमच्या मोबाइल स्क्रीनवर उपलब्ध होईल.

हे देखील वाचा

Gold Mutual Fund | अवघ्या 500 रुपयात खरेदी करू शकता सोने, Gold मध्ये करा गुंतवणूक; मिळेल शानदार रिटर्न

LIC Saral Pension Plan | एलआयसीचा नवीन प्लान ! एकदा प्रीमियम भरून दरमहिना मिळवा 12000 रुपये; सोबतच सहज मिळेल कर्ज

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : KNOW YOUR POSTMAN | mumbai postal reigon launches know your postman mobile application

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update