अवघ्या एका सेकंदात जाणून घ्या तुमचा #SmartPhone खरा आहे की खोटा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आज लाखो स्मार्टफोन बाजारात विक्रीसाठी आहेत. अनेक नवीन कंपन्यांचा त्यात समावेश आहे. बऱ्याचदा ग्राहकांचा संभ्रम निर्माण होतो की, आपण घेतलेला स्मार्टफोन हा खरा आहे की खोटा. परंतु आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशनने एक सुविधा सुरु केली आहे. त्याद्वारे तुम्ही एक एसएमएस पाठवून तुमच्या फोनबद्दल पूर्ण माहिती घेऊ शकता. एसएमएस व्यतिरीक्त तुम्ही C-DOT या अ‍ॅपच्या मदतीनेही ही माहिती घेऊ शकता. अवघ्या एका सेकंदात तुम्ही जाणून घेऊ शकता की, तुमच्याकडे असणारा स्मार्टफोन हा खरा आहे की खोटा.

SMS द्वारे असे माहीत करा स्मार्टफोन खरा आहे की खोटा
रिपोर्टनुसार, आपल्याला एक मेसेज टाईप करायचा आहे. त्यात तु्म्हाला लिहायचे आहे की, KYM यानंतर स्पेस देत 15 अंकाचा तुमच्या मोबाईलचा IMEI नंबर टाईप करा आणि हा मेसेज 14422 या नंबरवर पाठवा. यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल ज्यात तुमच्या फोनबद्दल कंपनीसोबतच इतर सर्व माहिती मिळेल. जर तुम्हाला तुमच्या फोनचा IMEI नंबर माहीत नसेल तर तुम्ही तो सहज मिळवू शकता. *#06# डायल केल्यानंतर तु्म्हाला लगेच तुमच्या फोनचा आयएमईआय नंबर मिळेल. याशिवाय तुमच्या फोनच्या बॉक्सवरदेखील हा आयएमईआय नंबर सहज मिळेल.

KYM द्वारे असे माहीत करा स्मार्टफोन खरा आहे की खोटा
एसएमएस व्यतिरीक्त तुम्ही आणखी एका पर्यायाद्वारे जाणून घेऊ शकता की तुमचा स्मार्टफोन खरा आहे की खोटा. गुगल प्ले स्टोरमधून तुम्हाला KYM- Know Your Mobile अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. या अ‍ॅपच्या मदतीनेही तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्हाला हे सुद्धा कळू शकेल की, तुमच्या स्मार्टफोनचा आयएमईआय नंबर हा ब्लॉक केला आहे किंवा नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us