काँग्रेसचे युवा आमदार ऋतुराज पाटील ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, प्रकृती स्थिर

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढत असून दिवसांगणीक विक्रमी कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. राज्यातील राजकीय नेते व लोकप्रतिनिधींना कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले असून आता कोल्हापूर दक्षिणचे काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. ऋतुराज यांनी स्वत: या संदर्भात ट्विट केलं आहे.

ऋतुराज पाटील यांनी ट्विट करून माहिती देताना सांगितले, माझी कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. काल रात्री रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कोल्हापुरात उपचार सुरु आहेत. माझी तब्येत ठीक आहे. काळजी करु नये, असं त्यांनी म्हटलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

कोरोनाची साथ आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनच्या काळात लोकप्रतिनिधी विविध कामांनिमित्तानं मतदारसंघामध्ये फिरत आहेत. बैठका व अन्य जबाबदाऱ्यांमुळे त्यांचा अधिकारी व पोलिसांशी संपर्क येत आहे. त्यातूनच लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. ऋतुराजा पाटील हे देखील कोरोनाच्या काळात सातत्याने कोविड योद्धे म्हणून काम करत होते. या कामाच्या दरम्यान आलेल्या संपर्कातून त्यांनी कोरोनाची लागण झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.