Kolhapur Crime | पुण्यातील शेतकऱ्याकडे तब्बल 1 कोटीची लाच मागणारा बडतर्फ पोलीस नाईक गजाआड, ‘या’ प्रकरणात पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Kolhapur Crime | पुण्यातील शेतकऱ्याकडे तब्बल 1 कोटीची लाचेची मागणी (Demanding Bribe) करुन महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलात खळबळ उडवून देणाऱ्या निलंबित पोलीस नाईकाच्या (Suspended Police Naik) सांगली जिल्ह्यातून मुसक्या (Arrest) आवळल्या आहेत. जॉन तिवडे (John Tiwade) असे अटक करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे. त्याला आज (बुधवार) मिरज येथे अटक करण्यात आली. तिवडे याच्याविरोधात सप्टेंबर 2020 मध्ये नात्यातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण (Kidnapping of a Minor Girl) आणि अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा (FIR) दाखल होता. या गुन्ह्यात तो दोन वर्षापासून फरार होता. अखेर कुपडा पोलीस ठाण्यातील (Kupada Police Station) पथकाने त्याला बेड्या ठोकल्या आहेत. यानंतर आता लाच लुचपत प्रतिबंधक विभाग (Kolhapur ACB) त्याला ताब्यात (Kolhapur Crime) घेण्याची शक्यता आहे.

 

कोल्हापूर पोलीस (Kolhapur Police) दलातून निलंबित करण्यात आलेल्या पोलीस नाईक जॉन विलास तिवडे याने पुणे जिल्ह्यातील (Pune District) देहू रोड येथील शेतकऱ्याकडे शेतजमिनीचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्यासाठी तब्बल एक कोटी रुपयांची लाच मागितली होती. रकमेचा आकडा पाहून पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली होती. (Kolhapur Crime)

 

तिवडेने कर्नाटक येथून कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. कुपवाड पोलिसांनी मोबाईल लोकेशनद्वारे त्याचा बेळगाव हुबळी परिसरात शोध घेतला मात्र तो पोलिसांना सापडला नाही.
आज सकाळी संशयित तिवडे मिरजेत आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी सापळा रचून तिवडेला ताब्यात घेतले.
मुलीचे अपहरण व अत्याचार प्रकरणी त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

काय आहे 1 कोटी लाचेचे प्रकरण ?

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील देहूगाव (Dehugaon) येथील 70 वर्षीय शेतकऱ्याच्या जमिनीबाबत पुणे येथील महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण खंडपीठात (Maharashtra Revenue Tribunal Bench Pune) तीन दावे दाखल आहेत. त्याची सुनावणी सुरु आहे.
फेब्रुवारी 2022 मध्ये अनोळखी व्यक्तीचा तक्रारदार शेतकऱ्याला फोन आला.
तुम्ही मला प्रत्यक्ष भेटा किवां संपर्कात रहा, असे त्या व्यक्तीने सांगितले.
त्यानंतर तक्रारदार यांनी फोन करणाऱ्या व्यक्तीला संपर्क केला.
त्या व्यक्तीने शेतकऱ्याला कोल्हापूर येथील बसस्थानक परिसरात येण्यास सांगितले.

 

तक्रारदार शेतकरी 22 मार्च रोजी कोल्हापूर येथे गेले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात येऊन संपर्क साधला असता फोन करणारी व्यक्ती पोलीस असल्याचे समजले.
त्यानंतर त्याचदिवशी तक्रारदार व पोलीस यांची मध्यवर्ती बसस्थानक परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये बैठक झाली.
त्यावेळी जॉन तिवडे याने आपली ओळख करुन देत आपण पोलीस असल्याचे आणि महसूल खात्यातील बहुतांश वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आपले चांगले संबंध असल्याचे तक्रारदार शेतकऱ्याला सांगितले.

 

महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण खंडपीठ येथे आपल्या जमिनीबाबत तीन दावे दाखल आहेत.
काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपले ओळखीचे संबंध असल्याने प्रलंबित खटल्याचा निकाल आपल्या बाजून लावून देतो.
असे सांगून तुमच्या विरुद्ध असलेल्या पार्टीने एक कोटी रुपये देण्याची ऑफर दिल्याचे सांगितले.
आपल्या बाजूने निकाल लावण्यासाठी आपण किती देणार अशी विचारणा करुन एक कोटी रुपये मागितले.

 

पोलीस नाईक जॉन तिवडेवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार (Prevention of Bribery Act) गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला लवकरच अटक (Arrest) केली जाईल,
असे कोल्हापूर एसीबीचे (Kolhapur ACB Trap) पोलीस उप अधीक्षक आदिनाथ बुधवंत (Deputy Superintendent of Police Adinath Budhwant) यांनी सांगितले होते.
संशयित जॉन तिवडे याला यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये पोलीस अधीक्षकांनी निलंबित (Suspended) केले होते,
असेही बुधवंत यांनी सांगितले होते.

 

Web Title : – Kolhapur Crime | police naik who demanded a bribe of one crore from the farmer arrested by sangli acb

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा