Kolhapur News | मंत्र्याच्या गाडीला वाट करून देताना वाहतूक पोलिसांनं चक्क जीप चालकाच्या कानशिलातच वाजवली (व्हिडीओ)

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Kolhapur News | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे कोल्हापूर (Kolhapur News) दौऱ्यावर होते. त्यादरम्यान आव्हा़ड यांना वाहतूककोंडीचा अनुभव आला. आव्हाड यांच्या गाड्यांचा ताफा जात होता. ताफ्याला वाट करून देताना मात्र एका पोलिसाने (Police) वाहनचालकाला कानशिलात लगावली असल्याची घटना घडली. वाहनचालकावर हात उगारल्याचा व्हिडीओ (Video) आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

 

 

जितेंद्र आव्हाड यांच्या गाड्यांचा ताफा कोल्हापूरातील एका चौकातून अंबाबाईच्या दर्शनाला जात होता. त्यावेळी त्याठिकाणी वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, वाहनांमधून वाट काढताना पोलिसांची मात्र धावपळ दिसून येत आहे. अशातच ताफ्याच्या पुढे असलेल्या एका चारचाकी वाहनाला (Jeep) बाजूला करताना एका पोलिसाने पळत येऊन वाहनचालकाच्या कानशिलात लगावली आहे. (Kolhapur News)

दरम्यान, हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर देखील चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान या घटनेमुळे पोलिस अरेरावी करत असल्याचे सवाल परिसरातून उपस्थित होत आहे.

Web Title : Kolhapur News | jitendra awhad car stuck in traffic kolhapur police slaps other car driver video goes viral social media

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त