Kolhapur News | विनाअपाॅईंटेमेंट नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा मार्ग खुला; कलेक्टर रेखावर यांचा नवा प्रयोग

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Kolhapur News | अनेक नागरिकांचे जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय असे अनेक कामे असतात. त्यासाठी त्यांना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांची भेट घ्यायची असते. मात्र, कार्यालयातील असणाऱ्या नियमांनुसार नागरिकांना जिल्हाधिकारी यांची भेट घ्यावी लागते. कधी-कधी अधिकारी मिटिंगमध्ये किंवा दौऱ्यावरच असल्याचं आढळुन येतं. त्यामुळे लोकांचा खोळंबा होतो. कधी अधिकारी उपस्थित असेल तरी नंबर येऊपर्यंत ताटतकळत थांबावे लागते. या पार्श्वभुमीवर नागरिकांच्या सोयीसाठी आता कोल्हापुरचे (Kolhapur News) नुतन जिल्हाधिकारी राहुल रेखावर (Collector Rahul Rekhawar) यांनी नवीनच प्रयोग आणला आहे.

आपल्या कार्यालयात नागरिकांना ताटकळत बसू लागू नये यासाठी आपले दरवाजे खुले केले आहेत. चिठ्ठीविना आणि विना अपाॅईंटेमेंट नागरिकांना भेटण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या लांबच्या गावातुन कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector’s Office) येत असतात. अधिकारी यांना वेळेत भेटने व्यक्तीला कठिण होत असते. कधी कधी कार्यालयाचा दरवाजा देखील बंद असतो. कार्यालयातील मंडळी नागरिकांना साहेब मिटिंगमध्ये आहे असे देखील सांगितले जाते. त्यामुळे लोकांचा हेलपाटा होत असतो. हे नियम आता बदलले गेले आहेत.

कोल्हापुरचे नुतन जिल्हाधिकारी राहुल रेखावर (Collector Rahul Rekhawar) यांनी आपले दरवाजे खुले केले आहेत. आपल्या कार्यालयाचे दोन्ही दरवाजे सताड उघडे ठेवण्याचा आदेश दिला आहे. भेटायला आलेल्या व्यक्तींना क्रमानुसार सोडण्यास सांगण्यात आले आहे. लोकांना भेटण्यापुरतेच दरवाजे खुले झालेले नाहीत तर नागरिकांना आपले काम झाले की नाही, हे सुद्धा कळविण्याची व्यवस्था रेखावार यांनी बसवली आहे. संबंधित नागरिकाच्या अर्जावरच काम झाले नाही तर पुन्हा केव्हा भेटायचे, याची नोंद रेखावार यांनी करून दिलेली असते. त्यामुळे नागरिकांनाही एकाच कामासाठी पुन्हा-पुन्हा यावे लागत नाही.

दरम्यान, यासाठी त्यांनी सर्व व्यवस्था देखील केली आहे.
यासाठीचे साॅफ्टवेअरचीही व्यवस्था ते करणार आहेत.
त्यामुळे नागरिकांना आपला अर्ज, फाईल कुठे आहे, कोणत्या टेबलवर अडली आहे, याचा तपास ऑनलाईन घेता येईल.
जिल्हाधिकारी रेखावार (Collector Rahul Rekhawar)यांनी ही पद्धत बीडचे जिल्हाधिकारी म्हणून राबवली होती.
ती यशस्वी झाली होती. तशीच पद्धत आता कोल्हापूरात देखील सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

Web Titel :- Kolhapur News | kolhapur collector ias rahul rekhawar opens doors collector’s office for common man

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Crime News | खासगी रुग्णालयात कंपाऊंडरनेच केला महिला रुग्णावर अत्याचाराचा प्रयत्न

Maha Vikas Aghadi | शिवसेना, राष्ट्रवादी अन् काँग्रेसचं सरकार कसं बनलं : शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं…

Coronavirus in india | देशात गेल्या 24 तासात 33 हजार 376 नव्या कोरोनाबाधितांची नोंद