Kolhapur News | संरक्षण भिंत कोसळून महिलेचा मृत्यू; कोल्हापुरातील घटना

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Kolhapur News | कोल्हापुरातील एक दुर्दैवी बातमी (Kolhapur News) समोर आली आहे. येथील खासबाग मैदानाची (Khasbag Maidan) संरक्षण भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू (Death) झाला. ही घटना मंगळवारी घडली. नाटक पाहायला आलेल्या या दोन महिला या ढिगाऱ्याखाली अडकल्या होत्या. नंतर त्यांना बाहेर काढण्यात आले. पण त्यापैकी एकीचा मृत्यू झाला आहे. अश्विनी यादव (Ashwini Yadav) असे मृत महिलेचे नाव आहे. संध्या तेली (Sandhya Teli) ही महिला जखमी आहे.

याबाबत माहिती अशी की, कोल्हापूर शहरातील (Kolhapur News) ऐतिहासिक कुस्तीचे मैदान असलेल्या खासबाग मैदानाची संरक्षण भिंत Protection Wall) कोसळून दोन महिला ढिगाऱ्याखाली अडकल्याची घटना घडली होती. कोल्हापूर महापालिकेच्या (Kolhapur Municipal Corporation) अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) अथक प्रयत्नानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन महिलांना बाहेर काढण्यात आले. या घटनेत दुर्दैवाने एका महिलेचा मृत्यू झाला.

अनेक दिवसापासून कोल्हापुरात पावसाचा (Kolhapur Rain) जोर वाढला आहे.
मंगळवारी अतिपावसामुळे संध्याकाळच्या सुमारास खासबाग मैदानाच्या पूर्वेकडील भली मोठी भिंत कोसळली.
20 फूट उंच आणि आणि 50 फूट लांब असलेली ही प्रेक्षक गॅलरीची भिंत कोसळली.
यावेळी या दोन महिला लघुशंकेसाठी भिंतीच्या कडेला गेल्या होत्या.
भिंत पडल्यानंतर दोघीही त्या ढिगार्‍याखाली अडकल्या होत्या.
त्यांना बाहेर काढताचा एका महिलेचा मृत्यू झाला तर एक महिला जखमी आहे.
जखमी महिलेवर उपचार (Treatment) सुरू आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजचा पुण्यातील दर

Maharashtra Rain Update | राज्यात आजही जोरदार पावसाचा इशारा; पुण्यासह सातारा, कोकण, रायगड आणि रत्नागिरीला ‘रेड अलर्ट’

Supreme Court | ”मतदारांना उमेदवाराची माहिती जाणून घेण्याचा अधिकार” – सर्वोच्च न्यायालय

Google Search Enhances Women’s Sports Coverage for 2023 FIFA Women’s World Cup